Home वाशिम आज वाशिम येथे मनसे जनहित व विधी विभाग आणि दिव्या स्वयंसहायता महिला...

आज वाशिम येथे मनसे जनहित व विधी विभाग आणि दिव्या स्वयंसहायता महिला संस्थेचा भव्य महिला रोजगार मेळावा

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_182057.jpg

आज वाशिम येथे मनसे जनहित व विधी विभाग आणि दिव्या स्वयंसहायता महिला संस्थेचा भव्य महिला रोजगार मेळावा
महिला सन्मान योजना : कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
वाशिम,(गोपाल तिवारी)- केवळ चुल व मुल सांभाळणार्‍या महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक चौकट भक्कम करावी या उद्देशातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग आणि दिव्या स्वयंसहाय्यता महिला गट व बहूउद्देशिय संस्था चिखली बु. यांच्या आयोजनातून महिला सन्मान योजनेअंतर्गत आज ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक विठ्ठलवाडी मंगल कार्यालयात भव्य महिला रोजगार मेळावा व कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटक मनसे नेते राजुभाऊ उंबरकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी विभागाचे अध्यक्ष तथा सरचिटणीस अ‍ॅड. किशोर शिंदे यांची उपस्थिती राहील. प्रमुख अतिथी म्हणून महिला सेनेच्या राज्याध्यक्षा रिटाताई गुप्ता, संपर्क नेते विठ्ठलभाऊ लोखंडकर, राज्य उपाध्यक्ष आनंद एबंडवार, राज्य सरचिटणीस महेश जोशी, राज्य उपाध्यक्ष अरुण तिवारी, पराग सावजी, विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. पंकज फेदरे, राज्य सरचिटणीस अ‍ॅड. नंदकिशोर शेळके, जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, जिल्हाध्यक्ष राजु किडसे, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नामदेव जुमडे, शहराध्यक्ष गणेश इंगोले, शहर संघटक प्रतिक कांबळे, जिल्हा सचिव सौ. स्मिता जोशी, कामगार सेनेचे ओमप्रकाश फड, सौ. भारती चव्हाण, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, जिल्हा चिटणीस मोहन कोल्हे, श्री देशमुख, यश चव्हाण, समाज प्रबोधनकार गुरुवर्य जीवनराव देशमुख यांची उपस्थिती राहील. तर मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संजय खांबाईत, एमसीईडीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, महाआयटीचे व्यवस्थापक सागर भूतडा, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे संतोष नांदणकर, मिटकॉनचे भगत, संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डी.व्ही. भागवतकर, वसंतराव नाईक महामंडळाचे कु. कल्पना मुळे, शंकर हमाने, दिव्यांग महामंडळाचे एकनाथ कांबळे, आयुष्यमान भारतचे डॉ. रणजीत सरनाईक, ओबीसी महामंडळाचे नितीन बळवंत, पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त संजय गोरे, माविमचे व्यवस्थापक राजेश नागापुरे, कांचन मल्टीसर्विसेसचे कपिल सारडा, ग्रामीण बँकेचे संचालक धनाजी बोइले, ग्रामीण विकास यंत्रणेचे किरण ओवे, महिला व बालकल्याण विभागाचे अमोल देशपांडे, एचडीएफसी बँकेचे सचिन शेळके, ओम कोरडे, उद्योजक रौनक टावरी, स्त्री अब्रु रक्षा प्रतिष्ठानचे दिपक भालेराव आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या मेळाव्याला जिल्हयातील महिला भगिनी व नागरीकांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मेळाव्याच्या आयोजिका आणि मनसे जनहित व विधी विभागाच्या राज्य उपाध्यक्षा प्रा. संगीताताई चव्हाण यांच्यासह दिव्या स्वयंसहाय्यता महिला गट व बहूउद्देशिय संस्था चिखली बु. यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous articleदिव्यांगांच्या आरक्षीत भूखंडावरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी रुद्र अपंंग संघटनेची आंदोलनाची हाक
Next articleपरळीत घिसाडी समाजाच्या महिलेस मारहाण तर पत्रकार मोहन चव्हाण यांचेवर प्राणघातक हल्ला!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here