राजेंद्र पाटील राऊत
🛑 परळ येथील महात्मा गांधी रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांची भेट घेण्यात आली.
परळ मधील महात्मा गांधी रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तसेच डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी कार्यतत्पर आहेत असे असून देखील रुग्णालय जवळपास मोकळे असते.
हॉस्पिटल सुरु करण्यात ज्या प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर कराव्यात व कामगार भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन आज शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. उमेश येवले यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्यमंत्री मा.ना. राजेश टोपे यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात युवक तालुका अध्यक्ष विशाल कनावजे, अल्पसंख्याक अध्यक्ष इसरार खान, सक्रिय पदाधिकारी राजेंद्र खानविलकर, तुषार पाटेकर इत्यादी उपस्थित होते
जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाचा फोडणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांचे मन:पुर्वक अभिनंदन..⭕