Home बीड परळीत घिसाडी समाजाच्या महिलेस मारहाण तर पत्रकार मोहन चव्हाण यांचेवर प्राणघातक हल्ला!

परळीत घिसाडी समाजाच्या महिलेस मारहाण तर पत्रकार मोहन चव्हाण यांचेवर प्राणघातक हल्ला!

866
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_103211.jpg

परळीत घिसाडी समाजाच्या महिलेस मारहाण तर पत्रकार मोहन चव्हाण यांचेवर प्राणघातक हल्ला!
परळी बीड,(ब्युरो टीम युवा मराठा न्यूज नेटवर्क)- बीड जिल्ह्यातील परळी शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मोंढा मार्केट येथे वर्षानूवर्षा पासून शेती उपयोगी औजारे विक्री करणाऱ्या सोनाली सुशील सोळंके या महिलेने या जागेवर शेती औजारे विकण्याचे दुकान लावू नये म्हणून त्या ठिकाणी फळ विक्रेता रहिम बागवान व गफ्फार बागवान आणि इतर दोघांनी मिळून या हातावर पोट भरणा-या महिलेचे शेती औजाराचे साहित्य इतरत्र रस्त्यावर फेकून दिले व त्या महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.वास्तविक सोनाली सोळंके हि महिला गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर बसून आपला व्यवसाय करीत असताना या गुंड प्रवृत्तीच्या दादागिरी करणा-यांनी सदरची जागा हडप करण्यासाठी हे कुटील कारस्थान केले.या घटनेची माहिती सोनाली सोळंके यांचे बंधू पत्रकार मोहन चव्हाण यांना समजताच ते मोंढा मार्केट परिसरात घटनास्थळी पोहचले त्यांनी वरील मुस्लिम धर्मीय गुन्हेगारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता पत्रकार मोहन चव्हाण यांच्या डोक्यात रहिम बागवान, गफ्फार बागवान व अन्य दोघांनी जड लोखंडी दोन किलो वजनाचे माप मारून गंभीररीत्या जखमी केले.या घटनेत पत्रकार मोहन चव्हाण यांचा दोष तो काय गुन्हेगारांना समजावून सांगितले तरी ते ऐकत नसल्यामुळे चव्हाण यांनी घटनास्थळी फोटो चित्रिकरण करुन पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगताच वरील गुन्हेगारांनी हा प्राणघातक व अमानूष हल्ला चव्हाण यांचेवर केला.सदर घटना हि १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १२-३० वाजेच्या सुमारास घडली असली तरी पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकार मोहन चव्हाण यांचेवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू अ सल्याचे कळते.तर या घटनेचा युवा मराठा महासंघाने तीव्र शब्दांत निषेध केला असून हल्लेखोर गुन्हेगारांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here