Home उतर महाराष्ट्र विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून भानसहिवरा येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून भानसहिवरा येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_190952.jpg

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून भानसहिवरा येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.                                       नेवासा ( कारभारी गव्हाणे)-

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने देशभर केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू आहे. या माध्यमातून सरकारने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहविण्यात येत आहे . ही यात्रा दि. १५ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. आज दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

भानसहिवरा येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी मा. आ.बाळासाहेब मुरकुटे साहेब , जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील , तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी , जमाभाऊ जाधव देविदास साळुंके , लक्ष्मण मोहिटे , विश्वासराव काळे मानव साळवे , अण्णा गव्हाणे काळे मामा , राजेंद्र कीर्तने , सोमनाथ शेंडे , अशोक कदम , बाबासाहेब नवथर , आबासाहेब चिंधे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here