• Home
  • 🛑 भारतात Realme ने लाँच केला पहिला 100w soundbar; जाणून घ्या किंमत 🛑

🛑 भारतात Realme ने लाँच केला पहिला 100w soundbar; जाणून घ्या किंमत 🛑

🛑 भारतात Realme ने लाँच केला पहिला 100w soundbar; जाणून घ्या किंमत 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 9 ऑक्टोबर : ⭕ Realme ने काल आपल्या मेगा इव्हेंट दरम्यान बरीच उत्पादने बाजारात लाँच केली आहेत. या उत्पादनांमध्ये टीव्ही, स्मार्टफोन, कॅमेरे, इलेक्ट्रिक टूथब्रश आणि वायरलेस हेडफोन्सचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने आपला नवीन Realme 100W साऊंडबारही भारतीय बाजारात लाँच केला आहे. या साऊंडबारमध्ये 40W सबवुफर आणि 60W फूल-रेंज स्पीकर्स देण्यात आहेत.

Realme 100W साऊंडबारची किंमत 6,999 रुपये आहे आणि त्याची विक्री 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ग्राहक हे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतील. लवकरच हा साऊंडबार ऑफलाइन स्टोअरमधूनही विक्री करण्यात येईल असे कंपनीकडून सांगितले जात आहे.

या साऊंडबारमध्ये दोन फूल-रेंज 2.25-इंच 15W स्पीकर्स आणि दोन 15W ट्वीटर आहेत. यासह, त्याचे टोटल आउट 60W आहे. तसेच 40W सबवूफर देण्यात आले आहे, ज्याची फ्रिक्वेंसी रेंज 50Hz ते 24KHz आहे.

हा साउंडबार स्लीक डिझाइन असून कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात ऑप्टिकल ऑडिओ पोर्ट, कोएक्सियल पोर्ट, एचडीएमआय (एआरसी) पोर्ट, ऑक्स-इन आणि यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. यासह, ब्लूटूथ v5.0 साठी देखील सपोर्ट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, टीव्हीचा आवाज 200 टक्क्यांनी वाढवता येऊ शकतो.⭕

anews Banner

Leave A Comment