• Home
  • 🛑 रिक्षावाल्या काकांच्या मदतीला धावून आल्या..! शिवसेनेच्या वृषाली पवार 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 रिक्षावाल्या काकांच्या मदतीला धावून आल्या..! शिवसेनेच्या वृषाली पवार 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

 

🛑 रिक्षावाल्या काकांच्या मदतीला धावून आल्या..! शिवसेनेच्या वृषाली पवार 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे /खडकी बाजार :⭕ कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन ही हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. ज्याला त्याला आपला संसार कसा चालेल याची काळजी वाटत असताना खडकीतील रिक्षाचालकांना लॉकडाऊनमध्ये मदतीचा हात देत खडकीतील शिवसेना महिला उपविभाग संघटनेच्या संघटिका वृषाली पवार यांनी भाजीपाला व कांदा प्रत्येक रिक्षास्टॅण्डवर जाऊन रिक्षाचालकांना दिला.

पवार यांनी स्वखर्चाने भाजीपाला मंडई मधून आणून घरी स्वच्छ निवडून सर्व प्रकारची भाजी एका एका पिशवीत बंद करून सोबत महिला कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक रिक्षा स्टॅण्ड वर जाऊन रिक्षाचालकांना दिला.
यावेळी रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसत होते. जेव्हापासून लॉकडाउन सुरू आहे. तेव्हापासून रिक्षा व्यवसाय ही पूर्णपणे बंद आहे.

याकरिता खडकीतील रिक्षाचालकांनी मदत मिळण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत रिक्षाचालकांना कसलीही मदत मिळाली नाही. शिवसेनेच्या वृषाली पवार यांनी फुल नाय फुलांची पाकळी मदत केल्यामुळे रिक्षाचालकांनी शिवसेनेचे व पवार यांचे आभार मानले…⭕

 

 

 

 

 

 

 

 

anews Banner

Leave A Comment