- 🛑 तुमच्या तोंडावर लावलेल्या मास्क विषाणू रोखतो का ?..जाणुन घ्या माहिती मास्क कसा असावा..🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕मास्कचा चुकीचा वापर ठरेल घातक ः
पोलिसांची भीती किंवा जनाची लाज म्हणून बाहेर पडल्यावर मास्क घालणारे अनेक लोक दिसतात. परंतु तो मास्क योग्य पद्धतीने घातलाय का? त्यातून संसर्ग तर होणार नाही ना? याची काळजी मात्र कोणीही घेताना दिसत नाही.
मास्क कसा असावा?
– वैद्यकीय कर्मचारी वगळता इतरांनी मास्क घेताना त्याचे कापड, आकार आणि श्वसनासाठीची योग्यता तपासणे गरजेचे.
– शक्यतो सुती कपड्याचा तोंड आणि नाक व्यवस्थित झाकणारा मास्क निवडावा.
– दोन किंवा अधिक पडदे असलेला आणि नाका जवळ फुगवटा असलेला मास्क उत्तम.
– मास्कच्या कडा चेहऱ्यावर व्यवस्थित “फिट्ट’ झाल्या पाहिजे.
– वॉल्व असलेला मास्क शक्यतो टाळा.
मास्क लावताना ही घ्या काळजी?
– मास्क हातात घेण्यापूर्वी आणि काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा.
– तुटलेला, खराब असलेला मास्क वापरू नका.
– मास्कच्या दोन्ही बाजूंच्या दोऱ्यांनाच हात लावा.
– नाक, तोंड आणि हनूवटी झाकेल, तसेच कुठेही गॅप राहणार नाही अशा पद्धतीने मास्क बांधा.
– स्वच्छ प्लास्टिक किंवा इतर बॅगमध्ये मास्क ठेवा.
– मास्क नियमित स्वच्छ धुवा.
हे टाळाच ः
– सैल असलेला मास्क वापरू नका.
– नाक उघडे ठेवू नका.
– श्वास घ्यायला अडचण येत असलेले मास्क वापरू नका.
– आपला मास्क दुसऱ्याला देऊ नका.
– ओले, अस्वच्छ, प्लास्टिक पासून बनलेले, कमी आकाराचे मास्क वापरू नका.
– सतत मास्कला हात लावू नका.
– बोलताना मास्क काढू नका.
– चुकीच्या पद्धतीने दुसरी व्यक्ती जवळ असताना मास्क काढू नका….⭕
