• Home
  • साल्हेर भागात कोरोनाचा फैलाव वाढण्याचीच दाट शक्यता* (नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज)

साल्हेर भागात कोरोनाचा फैलाव वाढण्याचीच दाट शक्यता* (नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज)

*साल्हेर भागात कोरोनाचा फैलाव वाढण्याचीच दाट शक्यता*
(नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज)
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील साल्हेर परिसरात शिवकालीन किल्ला पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने या भागात कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
साल्हेर येथे शिवछत्रपतीच्या पुनीत पावन पदस्पर्शाने पावन झालेला शिवकालीन साल्हेरचा किल्ला असून हा किल्ला बघण्यासाठी दिवसेंदिवस मुंबई पुणे नाशिक तसेच परराज्यातून पर्यटक हजारोच्या संख्येने गर्दी करत असल्याने त्याशिवाय येणाऱ्या पर्यटकाच्या तोंडाला मास्क नसणे किंवा त्यांचेकडून कोरोनाबाधित नसल्याचे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने या भागाची त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.शासनाने वेळीच यावर कठोर उपाययोजना करुन या भागात येणाऱ्या पर्यटकावर काही बंधने टाकावीत आणि हा भाग कोरोना संकटात सापडण्या पुर्वीच योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी युवा मराठा न्युजशी बोलताना केली.

anews Banner

Leave A Comment