• Home
  • 🛑 MG Gloster भारतात लाँच, किंमत २८.९८ लाख, जाणून घ्या डिटेल्स 🛑

🛑 MG Gloster भारतात लाँच, किंमत २८.९८ लाख, जाणून घ्या डिटेल्स 🛑

🛑 MG Gloster भारतात लाँच, किंमत २८.९८ लाख, जाणून घ्या डिटेल्स 🛑 काल

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 9 ऑक्टोबर : ⭕ एमजी ग्लोस्टर (MG GLOSTER) एसयूव्हीला आज भारतात लाँच करण्यात आले आहे. या कारची सुरुवातीची किंमत २८.९८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. एमजी ग्लोस्टरला ६ आणि ७ सीटर असे दोन पर्यायात आणले आहे. याला एकूण चार व्हेरियंटमध्ये म्हणजेच सुपर, स्मार्ट, शार्प आणि सेव्ही मध्ये आणले आहे. या कारच्या टॉप मॉडलची किंमत ३५.३८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

ही एमजीची सुरुवातीची किंमत आहे. ऑक्टोबर महिन्यात किंवा २ हजार बुकिंग होईपर्यंत ही किंमत वैध असणार आहे. यानंतर कारची किंमत वेगळी असणार आहे. एमजी ग्लोस्टरची बुकिंग कंपनीने आधीपासून सुरू केली आहे. या कारला १ लाख रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येवू शकते. कंपनीची वेबसाइट किंवा कंपनीची अधिकृत डिलरशीपकडून ग्राहकांना ही गाडी बुक करता येवू शकते. या कारची डिलिवरी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

एमजी ग्लोस्टर एक मोठी प्रीमियम एसयूव्ही आहे. कंपनीने याला केवळ एकाच इंजिन पर्यायात आणिले आहे. यात २.० लीटरचे ट्विन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. हे इंजिन २१५ बीएचपीचे पॉवर आणि ४८० न्यूटन माटरचे टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत ऑटोमॅटिक गियरबॉक्स देण्यात आले आहे. ग्लोस्टर देशाची पहिली स्तर १ ची ऑटोनोनमस प्रीमियम एसयूव्ही आहे. याला अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स सोबत लाँच करण्यात आले आहे.

एमजी ग्लोस्टर मध्ये १२.३ इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेट सिस्टम, ८इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, थ्री झोन क्लायमेंट कंट्रोल, कूल आणि हिटेड सीट, पॅनारोमिक सनरूफ, आयस्मार्ट टेक्नोलॉजी २.० सारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. एमजी ग्लोस्टरला वेगवेगळ्या व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले असून सुपर व्हेरियंटच्या ७ सीटरची किंमत २८, ९८, ००० रुपये, स्मार्ट व्हेरियंटच्या ६ सीटरची किंमत ३०, ९८, ००० रुपये, शार्प व्हेरियंटच्या ७ सीटरची किंमत ३३, ६८, ००० रुपये, शार्प व्हेरियंटच्या ६ सीटरची किंमत ३३, ९८, ००० रुपये, सॅव्ही व्हेरियंटच्या ६ सीटरची किंमत ३३, ३८, ००० रुपये किंमत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment