• Home
  • 🛑 वडगाव परिसरात आई – वडीलांनीच १३ दिवसाच्या मुलाला पुरुन ठेवले 🛑

🛑 वडगाव परिसरात आई – वडीलांनीच १३ दिवसाच्या मुलाला पुरुन ठेवले 🛑

🛑 वडगाव परिसरात आई – वडीलांनीच १३ दिवसाच्या मुलाला पुरुन ठेवले 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पुण्यातील वडगाव परिसरात एका 13 दिवसाच्या लहान मुलाला आई-वडिलांनी पुरून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळी सिंहगड पोलिसांनी धाव घेतली आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड भागातील वडगाव येथील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे गोदावरी हॉस्टेल आहे. या भागात जंगल आहे. दरम्यान हे बाळ अपंग आहे.

यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला या जंगलात खड्डा खानुन पुरले. हा सर्व प्रकार पोलिसांना समजला. यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान खड्डा उकरण्यासाठी तहसीलदार यांची परवाणगी लागते.

यामुळे पोलीस आता तहसीलदार यांच्याकडे गेले आहेत. तहसीलचे अधिकारी आल्यानंतर खड्डा खाणण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ माजली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याबाबत काही समजलेले नव्हते.

परीसरात मात्र याची माहिती वाऱ्या सारखी पसरली आहे. नागरिकांनी येथे तोबा गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले….⭕

anews Banner

Leave A Comment