• Home
  • 🛑 विधान परिषदे साठी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केली उमेदवारी 🛑

🛑 विधान परिषदे साठी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केली उमेदवारी 🛑

🛑 विधान परिषदे साठी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केली उमेदवारी 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होण्याची शक्यता असून एकूण 12 जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे राष्ट्रवादीकडून या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना यापैकी एका जागेवर संधी मिळेल.

तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजते. यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती.

काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरले होते. त्याविषयी जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले होते.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाईल.⭕

anews Banner

Leave A Comment