राजेंद्र पाटील राऊत
🛑 हरपुडे:चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना गाव विकास समितीचे महेंद्र घुग सर व अनघा कांगणे यांच्याकडून तातडीची अल्पशी आर्थिक मदत 🛑
✍️ देवरुख 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
रत्नागिरी/देवरुख:-⭕चक्री वादळात हरपुडे येथे नुकसान झालेल्या दत्ताराम शिवराम साळवी,बुधाजी नारायण घुग,पांडुरंग घुग यांना गाव विकास समितीचे महेंद्र घुग सर व सौ.अनघा कांगणे यांच्यावतीने अल्पशी आर्थिक मदत करून सहकार्य करण्यात आले.
यावेळी महेंद्र घुग सर यांच्यासोबत गाव विकास समितीच्या महिला संघटना उपाध्यक्षा व देवरुख विभाग अध्यक्षा सौ अनघा कांगणे,विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दैवत पवार,अनवी घुग उपस्थित होते.
नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी सौ अनघा कांगणे व महेंद्र घुग सर यांनी केली.⭕