Home जळगाव अल्पवयीन मुलीशी लग्न केले-सासरच्या लोकांविरूद गुन्हा

अल्पवयीन मुलीशी लग्न केले-सासरच्या लोकांविरूद गुन्हा

146
0

आशाताई बच्छाव

IMG_20231122_063232.jpg

अल्पवयीन मुलीशी लग्न केले-सासरच्या लोकांविरूद गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधि विजय पाटील– मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून देखील तिच्याशी लग्न लावून दिल्याने मुलगी गर्भवती होवून मुलाला जन्म दिला. याप्रकरणी तिचे आई वडिल व पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका गावातील 17 वर्षे 10 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचे ती अल्पवयीन असतांना देखील चाळीसगाव तालु्नयातील एका गावातील मुलाशी त्याच्याच कुटुंबीयाने लग्न लावून दिले.
लग्न झालेल्या मुलगी व मुलगी यांच्या शारीरीक संबंधातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहीली. त्यातून तिने मुलाला जन्म दिला. ही घटना 22/7/2022 ते 10/8/2023 दरम्यान तालुक्यातील एका गावात घडला.
याप्रकरणी पीडित मुलीने पोलीसात धाव घेतल्याने पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा पती, सासरा, दीर,सासू, आई व वडिल अशा सहा जणांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बा.वि.प्र.अधि.2003चे कलम 10,12,बाल लैगिक अपराध सं.अधिनियम 2012चे कलम 4,6,12सह भादंवि कलम 376(2)(एन)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.

Previous articleफटाके फोडण्याच्या कारणातून पिंपरखेड तांडा येथे हाणामारी
Next articleब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरातील झाडांना मिळणार नवी ओळख‌…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here