Home जळगाव ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरातील झाडांना मिळणार नवी ओळख‌…

ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरातील झाडांना मिळणार नवी ओळख‌…

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20231122_063721.jpg

ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरातील झाडांना मिळणार नवी ओळख‌…

झाडांची गणना व जिओ टॅगिंग द्वारा झाडांचे होणार संवर्धन….

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात ओसाड व पडीक पंचविस हेक्टर क्षेत्रात टप्याटप्याने सोमनाथ माळी यांचे संकल्पनेतून सामाजिक वनिकरण विभाग व लोकसहभागातून दोन वर्षापासून पंचविस हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सध्या परिसरात भिषण दुष्काळ परिस्थिती आहे.
निसर्गटेकडी परिसरातील ही झाडे जगवण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. सेवा सहयोग फाऊंडेशन,एच.एस.डी.आय.च्या आर्थिक मदतीने येथील झाडांची देखभाल व संवर्धन पुढील काळात केले जाणार आहे. या अंतर्गत झाडांची गणना, झाडांचे जिओ टॅगिंग, खत,पाणी देणे,देखरेख ई.अक्टिव्हिटीज राबविण्यात येणार आहेत.
यासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंत सोनवणे, महेश चव्हाण, तुषार निरगुडे, मनिषाताई शेलार तसेच भिला पाटील,सुचित्राताई पाटील, जलमित्र परिवाराचे शशांक अहिरे,सामाजिक वनिकरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली व सेवा सहयोग ग्रामोदयचे पंकज राठोड,
निसर्गटेकडीचे वृक्षमित्र विलास चव्हाण, किशोर चव्हाण, जिता चव्हाण, छोटू राठोड आदींच्या परिश्रमातून झाडांचे संगोपन व संवर्धन होणार आहे.
निसर्गटेकडी प्रकल्प हा खान्देंशातील एकमेव प्रकल्प म्हणता येईल ज्या साठी शेकडो हात सरसावून मदत देत आहेत.

Previous articleअल्पवयीन मुलीशी लग्न केले-सासरच्या लोकांविरूद गुन्हा
Next articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here