Home भंडारा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

107
0

आशाताई बच्छाव

IMG_20231122_064232.jpg

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत पोलीस ग्राउंड मुख्यालय भंडारा येथे आले असता अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपंगाच्या विविध समस्या विषयी निवेदन देण्यात आले .देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये भारतीय जनगणनेच्या कायद्यानुसार अपंगाची जनगणना करून निवडणुकीत १०/ टक्के प्रतिनिधित्व देण्यात येण्यात यावे त्याचप्रमाणे शासनाच्या विविध महामंडळावर प्रतिनिधित्व अधीस्वीकृती देण्यात यावी, दिव्यांगाचे मनोबल वाढवून व त्यांचे स्वामित्व घडवून त्यांच्याकरता विविध योजना राबविण्यात यावेत, दिव्यांगाची ग्राम स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत नोंदणी करून स्वयंरोजगाराची व नोकरीची सोय उपलब्ध करून देण्यात यावी , दिव्यांगासाठी शहरी स्तरावर शासकीय योजनेद्वारे ऋणानुबंध या योजनेची जातीय ,धर्म, पंथ यांचा सलोखा ठेवून विवाह मेळावे आयोजित करून पुरस्कृत करण्यात यावेत , दिव्यांगाना उदरनिर्वाह भत्ता म्हणून दहा हजार रुपयाची मासिक तरतूद करण्यात यावी, दिव्यांगाना मोफत घर बांधून देऊन तीन एकर ओलिताखालील जमीन देण्यात यावी, दिव्यांगांची शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारची हेडसांड होऊ नये म्हणून कार्यालयासमोर सेवा पुरवण्याची तरतूद करण्यात यावी, दिव्यांगाना प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, दिव्यांगाना स्पर्धात्मक परीक्षेची तरतूद करून पुरस्कृत करण्यात यावे, दिव्यांगाना भविष्य निर्वाह निधी शासनाकडून तरतूद करण्यात यावी, दिव्यांगाना त्यांच्या पात्रेतेनुसार गाळे उपलब्ध करून स्वयंरोजगाराकरता करिता दोन लाखाची तरतूद करण्यात यावी, दिव्यांग ना उच्चत्तरीय वैद्यकीय सेवा खाजगी रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावी, दिव्यांग कंत्राटी तज्ञ समिती दिव्यांगाचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव मुरारी भांबोरे यांची नियुक्ती करण्यात यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार, अखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे ,पत्रकार कुलदीप गंधे ,पत्रकार हर्षवर्धन देशभ्रतार ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे ईमेल द्वारे सुद्धा 19 नोव्हेंबर 2023 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वि.पु .घोडके उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग यांना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी निवेदन पाठवून अपंग कंत्राटी पद भरती तज्ञ समितीवर दिव्यांगाचे प्रतिनिधित्व म्हणून अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव मुरारी भांबोरे यांची नियुक्ती करण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन पाठवण्यात आले.

Previous articleब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरातील झाडांना मिळणार नवी ओळख‌…
Next articleअमरावती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतरच त्यांचा दुसरा अमरावती जिल्हा दौरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here