Home अमरावती अमरावती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतरच त्यांचा दुसरा अमरावती जिल्हा दौरा.

अमरावती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतरच त्यांचा दुसरा अमरावती जिल्हा दौरा.

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20231122_064715.jpg

अमरावती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतरच त्यांचा दुसरा अमरावती जिल्हा दौरा.
————–
दैनिक युवा मराठा.
पी.एन. देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्री पदाचे सूत्र स्वीकारल्यानंतर हा त्यांचा अमरावती जिल्हा दौरा आहे. दौऱ्यानंतर २४ नोव्हेंबरला सकाळी जिल्हा नियोजन समितीचे बैठक घेतली जाणार आहे. सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार 23 नोव्हेंबर रोजी दुपारनंतर पालकमंत्र्यांचे अमरावतीत आगमन होईल काही विशेष कार्यक्रम उपस्थित नंतर येथेच त्यांचा मुक्काम होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते जिल्हा नियोजन समिती बैठक घेणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे त्यानिमित्ताने सर्व यंत्रणा सुचित केल्या असून, सर्व विभाग प्रमुखांना बैठकीला उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. डीपीसी च्या निमित्ताने जिल्हा नियोजन कार्यालय कामाला लागले असून, सर्व संबंधित यंत्रणा कडून आढावा घेणे, यंदाच्या नियोजनुसार किती कामे निश्चित केली, याची माहिती घेतली जात आहे. बैठकीदरम्यान गेल्या आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेत असताना चालू आर्थिक वर्षातील नियोजन ही निश्चित केले जात आहे. डीपीसी चे सचिव तथा जिल्हाधिकारी सर्व कठीयार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के याबाबतची तयारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here