Home भंडारा लावणी कार्यक्रमातील नृत्यांगणी तरुणीचा अश्लील व्हिडीओ वायरल तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मंडईतील...

लावणी कार्यक्रमातील नृत्यांगणी तरुणीचा अश्लील व्हिडीओ वायरल तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मंडईतील प्रकार

576
0

आशाताई बच्छाव

IMG_20231122_103642.jpg

लावणी कार्यक्रमातील नृत्यांगणी तरुणीचा अश्लील व्हिडीओ वायरल

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मंडईतील प्रकार

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)-झाडीपट्टीत दिवाळीनंतर गावागावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. लोककलेचा वारसा असलेल्या या उत्सवात आता काही गावांमध्ये डान्स हंगामाचा धुमाकूळ सुरू झाला असून बाहेर राज्याहून आणलेल्या नृत्यांगनासोबत अश्लील नृत्य केले जात आहे. असाच एक लज्जास्पद आणि किळसवाणा प्रकार तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी या गावच्या डान्स हंगामात झाला असून डान्स करताना तरुणीने चक्क विवस्त्र होत अश्लीलतेचा कळस गाठला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात झाला.
तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी येथे १८ नोव्हेंबर रोजी डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागपूर हून डान्स हंगामा पार्टीच्या नृत्यांगनांना पाचारण करण्यात आले होते. रात्री डान्स हंगामाचा कार्यक्रम सुरू झाला. सुरवातीला लावण्या आणि डान्स सुरू होते. हळूहळू कार्यक्रम रंगत गेला आणि रात्री २ वाजतानंतर कार्यक्रमाला अश्लीलतेचा रंग चढला. या हंगामात नृत्य करणाऱ्या एका तरुणीने एक एक करीत अंगावरील वस्त्र काढण्यास सुरूवात केली आणि क्षणातच ती विवस्त्र झाली. त्याच वेळी सोबतच्या तरुणाने सुध्दा तिच्या सोबत अश्लील नृत्य करण्यास सुरवात केली. त्यामुळे तरुण मंडळी शिट्टया वाजवून रंगात आली.काही टवाळखोर तरुणांनी पैशांची उधळपट्टी करीत मंचाकडे येत या तरुणीची छेड काढण्यास सुरवात केली. काहींनी विवस्त्र तरुणीला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अश्लीलतेचा कळस गाठत डान्स करणारे तरुण तरुणी अचानक तोल जाऊन स्टेज खाली पडले. हा सर्व प्रकार शरमेने मान खाली घालावी लागणारा होता. या सर्व प्रकारचा कुणीतरी व्हिडीओ काढला. मात्र, दोन दिवस हा व्हिडिओ कुणाच्या हाती लागू नये याची काळजी घेण्यात आली. अखेर मंगळवारी हा व्हिडीओ एका गृपवर व्हायरल झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कार्यक्रमाचे आयोजक किशोर मनिराम गौपाले रा. नाकाडोंगरी आणि आर. के. डान्स हांगामा ग्रुपच्या संचालक आहाके रा. नागपूर व सदस्य व प्रसार माध्यमावर व्हिडीओ वायरल झाल्याने मा. तहसिलदार सा. तुमसर यांचे परवाणगी पत्रामध्ये दिलेल्या अटिशर्तीचे उल्लंघन केल्याने फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट वरुन आरोपीतांविरुध्द गोबरवाही पोलीस ठाण्यात कलम 354 (ब), 509, 294, 114.34 भादवी सहकलम 67 मा.तं.का.सहकलम
110, 112, 117, 131 मपोका विविध कलामांतर्गत साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदणकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तुमसर ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे करीत आहेत.

Previous articleअमरावती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतरच त्यांचा दुसरा अमरावती जिल्हा दौरा.
Next articleबिग बजेट’शासन आपल्या दारी ‘ स्थगीत; लवकरच नवीन तारीख, प्रशासनाची माहिती.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here