Home नाशिक लासलगाव येथे संघर्ष योद्धा स्व. गोपीनाथ मुंडे यांना भाजपा मंडला च्या वतीने...

लासलगाव येथे संघर्ष योद्धा स्व. गोपीनाथ मुंडे यांना भाजपा मंडला च्या वतीने अभिवादन— दैनिक युवा मराठा

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20231213_062733.jpg

लासलगाव येथे संघर्ष योद्धा स्व. गोपीनाथ मुंडे यांना भाजपा मंडला च्या वतीने अभिवादन—

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडला च्या वतीने लासलगाव मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर यांच्या नेतृत्वात मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय संघर्ष योद्धा आदरणीय गोपीनाथ जी मुंडे यांच्या जयंती निमित अभिवादन व प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न झाला आहे.
लासलगाव शहर अध्यक्ष शेखर होळकर ,जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा स्मिताताई कुलकर्णी, डॉ विलास कांगणे, जेष्ठ नेते योगेश पाटील ,दतुलाल शर्मा यांच्या मार्गदर्शनात सदरील कार्यक्रम पार पडला. मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर, प्रमूख अतिथी डॉ कांगणे विशाल पालवे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. डॉ विलास कांगणे यांनी गोपीनाथजी यांचा भाजपा साठीची पक्ष बांधणी प्रवास, आज त्याची खऱ्या अर्थाने समाजाला असणारी गरज व त्यांचे आदर्श घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे. आजच्या सामूहिक कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दिलेल्या सन्मानासाठी धन्यवाद व्यक्त केले. तसेच ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा स्मिता ताई कुलकर्णी यांनी
अमोघ वक्तृत्व ,अद्वितीय लोकनेता, एक समर्पित संघर्ष योद्धा अश्या शब्दात गोपिनाथ जी यांना आदरांजली समर्पित केली.मूठभर कार्यकर्ते पेरून, असंख्य नेते पिकवण्यासाठी काबाड कष्ट करणारा, तसेच देशभर उपेक्षितांचा आवाज व स्वाभिमान जिवंत ठेवणारा दुहेरी हाडाचा नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याची गरज असे मनोगत व्यक्त केले तसेच मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर यांनी माहित नाही कुणाचा जन्म कुणास काय देऊन गेला हा लोकनेता आम्हाला आमची ओळख देऊन गेला असे अभिवादन व्यक्त करत उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास प्रमुख जिल्हा मंडल प्रत्येक आघाडी अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी उद्योग आघाडी मंडल अध्यक्ष नितिन शर्मा, सरचिटणीस निलेश जगताप, उपाध्यक्ष टाकळी सोमनाथ गांगुर्डे ,भोलादादा पवार, प्रकाश खलसे, पिंपळगाव नजीक दीपक कुलकर्णी, संतोष पवार, पाचोरा उत्तम नागरे, ब्राह्मण गाव गणेश फड बाळासाहेब होळकर मयूर वाघचौरे व परिसरातील बांधव उपस्थित होते.

Previous articleमुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’
Next articleहाडोळी गावला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार सरपंच माधवराव आमृतवाड यांच्या प्रयत्नाला यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here