Home बुलढाणा 75 अमृत मोहत्सवात सहभागी होण्याकरिता दुर्गादैत्य ग्रामपंचात तसेच शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी...

75 अमृत मोहत्सवात सहभागी होण्याकरिता दुर्गादैत्य ग्रामपंचात तसेच शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढुन गावकाऱ्यांचा उत्साह वाढवला

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0023.jpg

75 अमृत मोहत्सवात सहभागी होण्याकरिता दुर्गादैत्य ग्रामपंचात तसेच शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढुन गावकाऱ्यांचा उत्साह वाढवला

युवा मराठा न्युज वेब पोर्टल
रवि शिरस्कार,संग्रामपूर

भारत सरकारने यंदाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी 2 ऑगेस्ट पासुन वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन केले आहे.
सर्व देशवासियांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू केली आहे. ‘हर घर तिरंगा’ म्हणजे राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक तसेचऔपचारिक नाते आहे आणि हेच नाते त्यांच्या मनामध्ये प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. देशभक्ती आणि भावनिक संबंध देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली असुन जिथे 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व भारतीयांना राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी दिली जात आहे

याशिवाय देशातील अनेक शैक्षिणक संस्थांनी ‘हर घर तिरंगा’ प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा आणि इतर स्पर्धांचं आयोजन केले असुन ज्या माध्यमातून मुलांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल.असे अनेक प्रयत्न केले आहेत दि 09ऑगस्ट रोजी संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य येथील जिल्हापरिषद मुलांची शाळेतील मुलांची पुर्ण गावातून फेरी काढून हर घर तिरंगा नारे देऊन गावातील सर्व लोकांना आपल्या घरी तिरंगा फडकुन या मोहिमेत सहभागी होण्याकरिता उत्साहित केले
यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच- अमर तायडे, ग्रामसेवक- दिपाली माहुलकर, शाळा समिती अध्यक्ष- पंजाब वानखडे, ग्रामपंचायत सदस्य -संगीता अंभोरे, भाऊराव कातव, शिक्षक- आसोले
तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येत सहभाग होता.

Previous articleहिंदू मंदीरे आता सरकारमुक्त होणार?
Next articleवानखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here