Home नांदेड मोहनावती मुखेड जि नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार डॉ. तुषार राठोड...

मोहनावती मुखेड जि नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार डॉ. तुषार राठोड थेट कोरोना वार्डात…!!

111
0

राजेंद्र पाटील राऊत

मोहनावती मुखेड जि नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार डॉ. तुषार राठोड थेट कोरोना वार्डात…!!
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मागील वर्षी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे समर्पित कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. कोरोना सध्या देशामध्ये कोरोना ची दुसरी लाट सुरू आहे. मागील दोन-तीन आठवड्यापासून ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे जवळपास दोनशे रुग्णावर उपचार सुरू आहेत. गंभीर व अतिगंभीर रुग्णांना नांदेड येथे शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय अथवा खासगी दवाखान्यात खाटा सुद्धा उपलब्ध होत नाहीत, अशी गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना नांदेड येथील खासगी रुग्णालयाची फीस परवडत नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय मुखेड अधिक कार्यक्षमतेने चालले पाहिजे, गंभीर ते अतिगंभीर रुग्णांना नांदेडला रेफर न करता त्यांना इथेच सेवा दिली गेली पाहिजे, यासाठी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी जिल्हाधिकारी डॉ बिपिन विटणकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसिकर यांना उपजिल्हा रुग्णालय मुखेड च्या कामकाजाचा आढावा घेण्यास संबंधी मुखेड येथे बोलाविले. आज दिनांक 17 एप्रिल 20 21 रोजी संबंधितांच्या उपस्थित उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आमदार डॉक्टर तुषार राठोड स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन covid-19 वार्ड मध्ये फिरले व त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. मागील तीन-चार वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे आमदार तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून सिटीस्कॅन मशिन उपलब्ध झाली आहे. परंतु ती अद्यापही कार्यरत नाही. पुढील पंधरा दिवसात सिटीस्कॅन ची मशीन कार्यरत करण्यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी विपीन विटणकर यांनी दिल्या. मागील वर्षी कोरोना च्या पहिल्या लाटेत उपजिल्हा रुग्णालयास आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या स्थानिक विकास निधीतून व्हेंटिलेटर ची खरेदी करण्यात आली होती. ही सर्व व्हेंटिलेटर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरु नाही. त्यामुळे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी हे अतिदक्षता विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंबंधी ची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. गरज भासल्यास तज्ञ डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर मुखेड येथे पाठवा व अतिदक्षता विभाग तात्काळ सुरू करून गंभीर ते अतिगंभीर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथेच सेवा उपलब्ध करून देण्यास संबंधी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी सूचना केल्या. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये अतिदक्षता विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसिकर यांनी उपस्थितांसमोर दिली. सध्या मुखेड उपजिल्हा रुग्णालयात 85 जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अतिदक्षता विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास अधिकची ऑक्सिजनची गरज रुग्णांना पडू शकते. त्यामुळे अति दक्षता विभाग सुरू केल्यानंतर अधिकची ऑक्सिजनची गरज सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण केली जाईल असे डॉक्टर विपिन विटणकर जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नांदेड शहर वगळता ग्रामीण भागातील इतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रेमदेसिविर इंजेक्शन ची सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु मागील आठवड्यापासून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या सूचनेनुसार आतापर्यंत 120 रेमदेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे अनेक रुग्णांना नांदेड येथे रेफर करण्याची गरज भासली नाही. अतिदक्षता विभाग पूर्ण क्षमतेने सुरू केल्यानंतर गंभीर व अतिगंभीर रुग्णांची संख्या मुखेड येथे वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात अधिकच्या रेमडेसेविर इंजेक्शनची गरज येथे पडणारा आहे. त्यामुळे यापुढे अधिकचे इंजेक्शन मुखेड येथे उपलब्ध करून देण्यास संबंधीचे सूचना आमदार तुषार राठोड यांनी या बैठकीत दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here