Home माझं गाव माझं गा-हाणं ग्रुप ग्रामपंचायत उत्तराने गावातील व परिसरातील नागरिकांचा कोरोना लसीकरणला प्रतिसाद     

ग्रुप ग्रामपंचायत उत्तराने गावातील व परिसरातील नागरिकांचा कोरोना लसीकरणला प्रतिसाद     

131
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रुप ग्रामपंचायत उत्तराने गावातील व परिसरातील नागरिकांनी कोरोना लसीकरणला प्रतिसाद         सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
काल शनिवार रोजी प्राधमिक उपकेंद्र उत्तराने यांच्या माध्यमातून कोरोना लसीकरण करण्याचे नियोजन जायखेडा प्राधमिक आरोग्य केंद्र यांनी सुचवल्या प्रमाणे व ग्रामपंचायत उत्तराने यांच्या मागणी वरून आज 185 लाभार्त्याना कोरोना लस देण्यात आली त्याबद्दल आरोग्य कर्मचारी उत्तराने व जायखेडा यांचे ग्रुप ग्रामपंचायत उत्तराने तर्फे जाहीर आभार….पण कोरोना लस उत्तराने गावात न देता सर्वच लाभार्थ्यांना जायखेडा येथे आणा आम्ही जायखेडा केंद्रात त्याला लस देऊ असे डॉ.उमेश रामोळे यांचा सल्ला ….माझ्या गावातील जेष्ठ महीला, जेष्ठ पुरुष जे शासनाचे नियम पाळत गेल्या दोन महिने घरी व शेतात होते ते आज ग्रामपंचायत यांच्या सांगण्यानुसार गावातील मराठी शाळा या ठिकाणी सकाळी 8 वाजता येऊन बसले असताना काही झारीतील शुक्राचार्या मुळे कोरोना लस (इंजेक्शन) गावात येत नसेल तर….जेष्ठ मंडळी जायखेडा केंद्रात जाणार कशी ? कारण बऱ्याच मंडळींना गाडीत बसता येत नाही तर कोणाला चालता येत नाही नियोजना नुसार जर कोरोना लसीकरण उत्तराने गावात नियमानुसार ठरलेले असताना अचानक लसीकरण बंद का..? हा प्रश्न मी डॉ.कपिल आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी,व डॉ.हेमंत आहेरराव तालुका आरोग्य अधिकारी यांना उपस्थित करून…… माझ्या सर्व ग्रामस्थानाच्या व आज उत्तराने येथे आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात शंका उपस्थित झाली सर्वांची मागणी एक होती की एवड्या संख्येने नागरिक लसीकरणा साठी आलेले असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची अशी नाकर्ते भूमिका का..?…. आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने काही वेळ तणाव झाला व पत्रकारांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवला…..इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या दणक्या मुळे व पोलीसाच्या व डॉ.कपिल आहेर,डॉ.हेमंत अहेरराव,आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उत्तराने यांच्या सहकार्याने 12.20 ला लस उत्तराने येथे उपलब्द झाली व *नाशिक ग्रामीण जिल्ह्यात एका दिवसात सर्वात जास्त 185 नागरिकांना कोरोना लसीकरण उत्तराने गावात देण्यात आले त्या बद्दल उत्तराने गावात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार…*
🙏🏻🙏🏻🙏🏻

Previous articleमुंबईत खासगी वाहनांसाठी कलर कोड सक्ती: आता ‘हा’ स्टिकर गाडीवर नसल्यास होणार कारवाई 🛑
Next articleमोहनावती मुखेड जि नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार डॉ. तुषार राठोड थेट कोरोना वार्डात…!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here