Home मुंबई मुंबईत खासगी वाहनांसाठी कलर कोड सक्ती: आता ‘हा’ स्टिकर गाडीवर नसल्यास होणार...

मुंबईत खासगी वाहनांसाठी कलर कोड सक्ती: आता ‘हा’ स्टिकर गाडीवर नसल्यास होणार कारवाई 🛑

86
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मुंबईत खासगी वाहनांसाठी कलर कोड सक्ती: आता ‘हा’ स्टिकर गाडीवर नसल्यास होणार कारवाई 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई: ⭕कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि कोविड निर्बंध लादण्यात आले असताना मुंबईत रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली नसल्याने पोलिसांनी कठोर निर्णय घेतला आहे.

खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित करण्यात आले असून या कोडचा स्टिकर असलेली वाहनेच रस्त्यावर धावू शकणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात आली असून संबंधित वाहनांना स्थानिक पोलीस स्टेशनमधून हा कलर कोड स्टिकर मिळणार आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली. संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने मुंबई पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

याबाबत नगराळे यांनी माहिती दिली. कलम १४४ नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले आहेत.

त्यात अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड असणार आहे आणि भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे. कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

कलर कोड पद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहराचे प्रमुख एंट्री पॉइंट तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. या नाकाबंदीत स्टिकरशिवाय असणाऱ्या गाड्या अडवून तपासणी केली जाणार आहे.

कलर कोड नसेल मात्र वाहन अत्यावश्यक सेवेसाठी चालवले जात असेल तर कागदपत्र तसेच इतर शहानिशा करून त्या वाहनाला कोड दिला जाईल, असेही सांगण्यात आले.

विनाकारण फिरणाऱ्यांना वेसण घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कोडचे स्टिकर दिले जाणार आहेत. हे स्टिकर संबंधितांनी पोलीस स्टेशनमधून घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात आली असून काही ठिकाणी थेट रस्त्यावरच अशी वाहने थांबवून त्यांना स्टिकर लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

मुंबईत आता कडक लॉकडाऊन, विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर बंदी.⭕

Previous articleजेऊर ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविंड सेंटर सुरू होणार : आ . संजयमामा शिंदे 
Next articleग्रुप ग्रामपंचायत उत्तराने गावातील व परिसरातील नागरिकांचा कोरोना लसीकरणला प्रतिसाद     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here