Home पश्चिम महाराष्ट्र जेऊर ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविंड सेंटर सुरू होणार : आ . संजयमामा...

जेऊर ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविंड सेंटर सुरू होणार : आ . संजयमामा शिंदे 

109
0

राजेंद्र पाटील राऊत

जेऊर ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविंड सेंटर सुरू होणार : आ . संजयमामा शिंदे
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा (ता : ज्यावेळेस. कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली होती त्याच वेळेस आपण जेऊर ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांच्या ताब्यात सार्वजनिक बांधकाम विभागकडून घेतली होती . जी २०१७ पासून धूळ खात पडून होती .त्यावेळी २० बेड सेंट्रल लाईन ऑक्सिजन चे तयार करून ठेवले होते .कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मनुष्यबळ भरती झाली नव्हती मनुष्यबळ भरती साठी पाठपुरावा करून आज डॉक्टर , स्टाफ नर्स , वॉर्ड बॉय यांची भरतीची ऑर्डर सिव्हिल सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून करून घेतली .आता पुढील आठवड्यात हे डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून चालू करत आहोत . या सेंटरसाठी गरज भासल्यास इतर आवश्यक सोयीसुविधा आपण आमदार निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही आ . संजयमामा शिंदे यांनी यावेळी दिली . या कोविड सेंटरमध्ये सध्या २० ऑक्सिजन बेड व १० आयसोलेशन बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केली जाणार आहे .

Previous articleमहाराष्ट्राच्या मदतीला धावले मुकेश अंबानी; गुजरातच्या फॅक्टरीतून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा
Next articleमुंबईत खासगी वाहनांसाठी कलर कोड सक्ती: आता ‘हा’ स्टिकर गाडीवर नसल्यास होणार कारवाई 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here