Home माझं गाव माझं गा-हाणं पिंपळकोठेचे सरपंच मा. श्री किशोर भाऊ भामरे यांनी व सहकार्यांच्या पुढाकाराने गावातील...

पिंपळकोठेचे सरपंच मा. श्री किशोर भाऊ भामरे यांनी व सहकार्यांच्या पुढाकाराने गावातील नागरीकांच्चा आरोग्यासाठी टाकलेले नवे पाऊल .!

112
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपळकोठेचे सरपंच मा. श्री किशोर भाऊ भामरे यांनी व सहकार्यांच्या पुढाकाराने गावातील नागरीकांच्चा आरोग्यासाठी टाकलेले नवे पाऊल .!
असे कर्तव्यनिष्ठ तत्पर सरपंच व ग्रामसेवक प्रतेक गावास मिळावे                                                सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
पिंपळकोठा ता. सटाणा जि. नाशिक येथे कोरोणाच्या प्रखर प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष चालू . आजच्या जगात बघितल्या नुसार या महामारी च्या वेढ्या मध्ये सर्वच जणअटकले आहेत त्याच प्रमाणे पिंपळकोठा येथील ग्रामस्थांमध्ये सुद्धा या साथीच्या रोगाने घबराट निर्माण झालेली आहे .म्हणून तिचे प्रमाण जास्त झाले असताना गावात विलगीकरण कक्ष असावा . असे पिंपळकोठा ग्रामपंचायत सरपंच , सर्व सदस्य ग्रामसेवक त्यांचे सर्व कर्मचारी आणि गावकरी यांच्या संकल्पनेनुसार पिंपळकोठे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची संकल्पना आज प्रत्यक्षात साकारण्यात आली . त्या नुसार सदर कक्षाचे उद्घाटन बागलान तालुक्याचे विधानसभा प्रतिनिधी माननीय आ .श्री .दिलीप बोरसे ,गटविकास अधिकारी माननीय श्री कोल्हे साहेब, तहसीलदार श्री . इंगळे साहेब ताहाराबाद प्रा आरोग्य केंद्राच्या वैदय.आधिकारी सौ .नंदन मॅडम यांच्याहस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सदर विलगीकरण कक्षामध्ये कोरोणाने प्रभावित झालेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दाखल होऊन आपल्यापासून आपल्या कुटुंबियांना शेजाऱ्यांना बाधा होणार नाही हे लक्षात घेऊन सदर विलगीकरण कक्षामध्ये भरती व्हावे त्या ठिकाणी सर्व प्रकारचीवैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, स्नानगृह ,शौचालय , स्थानिक डॉ देवरे डॉ विलास भामरे डॉं पोपट पाटील24 तास सेवा देणार आहेतआणि गरज पडल्यास आपल्याला लागणाऱ्या योग्य औषध उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे .तरी पिंपळकोठे गाव व परिसरात राहणारे, मळ्यांमध्ये राहणारे नागरिक यांनी सदर सुविधेचा फायदा घ्यावा आणि आपल्या कुटुंबियांचे व शेजाऱ्यांचे संरक्षण आपणच करणार आहोत .ही भावना लक्षात ठेऊन विलगीकरण कक्षामध्ये दाखल होण्याचे आवाहन पिंपळकोठा ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर भामरे व आमदार श्रीयुत दिलीप बोरसे यांनी केली .

Previous articleमोहनावती मुखेड जि नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार डॉ. तुषार राठोड थेट कोरोना वार्डात…!!
Next articleकोरोना ही बिल गेटस्‌ची कल्पना; तो व्हायरस नसून दहशत…! बंडातात्या कराडकर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here