Home Breaking News देवळा तालुक्यात आमदार आहेरांनी केली नुकसानग्रस्त शेत शिवाराची पाहणी

देवळा तालुक्यात आमदार आहेरांनी केली नुकसानग्रस्त शेत शिवाराची पाहणी

112
0

देवळा तालुक्यात आमदार आहेरांनी केली नुकसानग्रस्त शेत शिवाराची पाहणी
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये अतिपावसाने खराब झालेल्या शेती पिकांची आमदार डॉ. राहुल आहेर यांनी नुकतीच पाहणी केली प्रामुख्याने डोंगरगांव, मेशी, उमराणे, ह्या गावांमध्ये कांदे,मका,कांदयाची रोपे ह्या शेती पिकांचे जवळपास शंभर टक्के नुकसान झाले असल्याचे त्यांच्या पाहणी दौऱ्यात लक्षात आले.त्यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी सम्बंधित यंत्रनेला दिल्या असून नुकसानग्रस्त शेती पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर आपण पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दतात्रेय शेजूळ,केदा शिरसाठ,डोंगरगांवचे सरपंच दयाराम सावंत,उमराणा बाजार समितीचे माजी सभापति विलास देवरे, जाणता राजा मित्रमंडळाचे नंदन देवरे, जि. प. सदस्य यशवंत शिरसाठ, सचिन देवरे,तलाठी राजेंद्र गुंजाळ,कृषि सहाय्यक ढवळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शिरसाठ यांसह ग्रामस्थ यावेळी हजर होते.

Previous article*धनगर st आरक्षण* *उद्या ढोल बजाओ आंंदोलन*
Next article*दहिवड परिसरात अतिवष्टीमुळे कांदा व डाळिंब पिकाचे प्रचंड नुकसान*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here