Home बुलढाणा वानखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद संपन्न

वानखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद संपन्न

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0025.jpg

वानखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद संपन्न

युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी रवि शिरस्कार वानखेड

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावातील हनुमान संस्थान येथे गेल्या अनेक वर्षांपासून अविरत हरिनाम सप्ताह सुरू आहे आज या महोत्सवाला 53 वर्षे पूर्ण झालेली असुन गेल्या तिसऱ्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा खुप मोठा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला होता आणि या वर्षी सुद्धा ही परंपरा जोपासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 10 ऑगस्ट रोजी या हरिनाम सप्ताहाचे पाच क्विंटल गहू व एक क्विंटल डाळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रिमझिम पावसाची रिपरिप चालु असतांना सुद्धा गावकऱ्यांच्या अफाट संख्येत हा महोत्सव मोठया उत्साहात पार पडला आहे या मोहोत्सवात गावातील सर्व महिला भगिनींनी घरी पोळ्या तयार करून स्वतःहा मंदिरावर आणून दिल्या सप्ताहाला सर्व गावातील भावी भक्तांचे सहकार्य लाभले असुन अन्नदात्यांचा फार मोठा हातभार लागत असतो तसेच गावातील तरुण मंडळींनीचे या कार्यक्रमाला खूप मोठे सहकार्य लाभले होते.

कार्यक्रमात गावातील सुभाष हागे, रामकृष्ण लोणाग्रे, जनार्धन हागे, विठ्ठल हागे, महादेव हागे, प्रल्हाद रौंदळे, शिवराम कुरवाडे, उत्तम बघे, उमेश दबडकार तसेच हनुमान संस्थानच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here