Home बुलढाणा आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या वसाली गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव संपन्न

आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या वसाली गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव संपन्न

144

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0021.jpg

आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या वसाली गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव संपन्न
युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी रवि शिरस्कार,संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील वसाली येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डावरे, कृषी उपसंचालक बेतीवार, उपविभागीय कृषी अधिकारी पटेल, जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विकास जाधव, कृषी विद्यवेता उमाळे, सरपंच पालकर, मुख्याध्यापक सुरत्ने यांची प्रमुख उपस्थितीत दि.9औगेस्ट रोजी रानभाजी महोत्सव आयोजित केला
यावेळी उमाळे यांनी रानभाजीचे आहारातील महत्त्व व आरोग्यासाठी त्या कशा लाभदायक आहेत, याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर टुनकी येथील डॉ. जयस्वाल यांनी आयुर्वेदात रानभाजीचे महत्त्व व बदलती आहारशैली व त्याचे आरोग्यावर होणारे दुषपरिणाम याची माहिती दिली रानभाज्यांचे संवर्धन करून त्या शहरी भागात विकून हंगामी रोजगार मिळवावा, असे आवाहन केले.
तसेच रानभाज्यान मध्ये तांदुळ जिरा, ज्योतीचे फुलं, फाजीची भाजी, बांबूचे कॉब, जंगली मशरूम, आघाडा, करटोली घोळ, कवठ .इत्यादी रानभाज्या उपलब्ध करून इतर अनेक रानभाज्यांची माहिती दिली
या मोहत्सवात रानभाजी महोत्सवाला महसूल विभागाचे तहसीलदार,नायब तहसीलदार,गटविकास अधिकारी,मंडळ अधिकारी व इतर अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच युवा स्वाभिमान पार्टी चे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष निखिल चौधरी, स्माईल हेल्पलाईन चे जिल्हा संपर्कप्रमुख शुभम महाले ,टुनकी शहर अध्यक्ष रितेश काटकर ,तसेच सर्व गावकरी मंडळी हजर होती.

Previous articleवानखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद संपन्न
Next articleप्रेस व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.