Home बुलढाणा संग्रामपूर महसूलच्या आशीर्वादाने वानखेड ते वरवट रोडच्या कामावर शेकडोब्रास अवैध रेती-रुळी चा...

संग्रामपूर महसूलच्या आशीर्वादाने वानखेड ते वरवट रोडच्या कामावर शेकडोब्रास अवैध रेती-रुळी चा खुलेआम वापर चालु.

132
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240324_071113.jpg

संग्रामपूर महसूलच्या आशीर्वादाने वानखेड ते वरवट रोडच्या कामावर शेकडोब्रास अवैध रेती-रुळी चा खुलेआम वापर चालु.

दबंग पातुर्डा मंडल अधिकारी उकर्डे मग गप्प का.?

(युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा)
संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वानखेड ते वरवट बकाल असे रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत संबंधित ठेकेदारामार्फत करण्यात येत असून याच रस्त्याने वानखेड गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातून शेतीमालाची वाहतूक नेहमीच करावी लागते अशा परिस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांना या रोडचे काम चांगले व्हावे असे सहाजिकच वाटेल परंतु त्यांच्याच नजरेसमोर वानखेड गावातील वान नदीपात्रातून गेल्या चार-पाच दिवसापासून अवैद्य रेती मिक्स रुढीचे उत्खनन करून चालू असलेल्या रोडच्या कामावर शेकडो ब्रास अवैद्य रेती मिक्स रुढी टाकण्यात येत आहे ही बाब स्थानिक नागरिकांनी महसूल विभागातील संबंधितांना कळविली असल्याचे स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले असून स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी किंवा पोलीस प्रशासनासह जबाबदार विभागाकडून वेळीच कार्यवाही झाल्यास चालू असलेल्या रोडच्या कामावर टाकलेली अवैद्य रेती मिक्स रुढी जप्त करून नियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाल्यास सदरच्या रस्त्याचे कामावर टाकलेल्या रेती मिक्स रुढीने होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला आळा बसेल त्यामुळे शासनाची होणारी फसवणूक सुद्धा थांबेल तसेच चोरट्या मार्गाने वापरलेल्या गौण खनिजावर कारवाई केल्यास महसूल सुद्धा मोठ्या प्रमाणात जमा होईल त्यामुळे यापुढे असे प्रकार होण्यास प्रतिबंध सुद्धा लागेल आणि भविष्यात निसर्गाची होणारी हानी सुद्धा थांबेल परंतु “रक्षकच जर भक्षक” बनत असतील तर यापुढे जनहितार्थ तसेच शासनाची होणारी फसवणूक उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करणारे महसूल मित्र तसेच पर्यावरण प्रेमी यांनी न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न ऐरणीवर येत आहे. आश्चर्याचे म्हणजे काही भ्रष्ट अधिकारी हे माफियांसोबत हात मिळवणी करून शासनाचे हित जोपासणाऱ्यालाचं दुखापत किंवा त्यांच्यावर हल्ला चढवण्याचे काम होत असल्याचे बऱ्याच तालुक्यात दिसून येते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच शासनाच्या गौणखणीजाची होत असलेली लूट थांबवून कायदा सुव्यवस्था आबाधित राहावा याकरिता पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

▶️ वानखेड येथील वाननदी पात्रातून शेकडो ब्रास अवैद्य रेतीमिक्स रूढी चे उत्खनन करून वानखेड ते वरवट या रोडच्या कामावर नदीपात्रातून चोरून आणलेला अवैद्य गौण खनिज टाकण्यात येत असल्याने होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला आळा बसावा म्हणून शेकडो ब्रास रोडच्या कामावर टाकलेली अवैद्य रुढी जप्त करून कार्यवाही करिता तहसीलदार टोम्पे यांना स्थानिक नागरिक भेटले असता त्यांनी लगेच कार्यवाहीचे आश्वासन तर दिले. परंतु ठेकेदाराने केलेल्या गैरप्रकारावर पांघरून घालण्याचे काम तहसीलदार योगेश्वर टोम्पे कडून होत असल्याचे दिसून येते हे ही मात्र तेवढेच खरे.
▪️ वानखेड नदीपात्रातून रेती मिक्स रुढीचे अवैद्य उत्खनन करून रोडच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून वापरण्यात येत असल्याचे वानखेड येथील स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली परंतु त्यांनी तहसीलदार यांच्याकडे माहिती देण्याचे सांगितल्यावरून स्थानिक नागरिकांनी तहसीलदार यांच्या दालनात जाऊन सर्व माहिती दिली असता अद्यापही कार्यवाही झाली नाही मग या आदिच्या ठिकाणी लाच लुचपत विभागाकडून कारवाई झालेल्यांचा काय फक्त “उदो उदो” करायचा आणि भ्रष्टाचार उघडकीस आणल्यास उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद हे मात्र वृत्तपत्रात बातमी लागल्यास नाराजी व्यक्त करत भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्यांची बाजू घेत असतील तर मग सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुठे..

🔴 सार्वजनिक बांधकाम विभागातीलअधिकाऱ्यांचे चांगभले* वानखेड ते वरवट चालू असलेल्या रोडच्या कामावर संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी फिरवूनही पाहत नसल्याने मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम होत असुन सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्याची हात मिळवणे असल्यानेचं सर्व नियम धाब्यावर ठेवून संबंधित ठेकेदारा कडून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम चालू असावे असे सूर नागरिकांमधून निघत आहेत.

Previous articleमाझ्या आठवणीतली होळी
Next articleआमदार निधीचा दुरुपयोग चौकशीची मागणी मुरादपूर येथील प्रकार…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here