• Home
  • रमेश निंबा बच्छावला अवदसा आठवली,साडेतीन हजाराची लाच घेतांना तुरुंगाची कोठडी नशिबी आली

रमेश निंबा बच्छावला अवदसा आठवली,साडेतीन हजाराची लाच घेतांना तुरुंगाची कोठडी नशिबी आली

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20201223_211331.jpg

रमेश निंबा बच्छावला अवदसा आठवली,साडेतीन हजाराची लाच घेतांना तुरुंगाची कोठडी नशिबी आली
लासलगांव,( ब्युरो टिम युवा मराठा न्युज)- एका महिलेकडून साडेतीन हजाराची लाच घेताना काल लासलगांवचे मंडळ अधिकारी रमेश निंबा बच्छाव यांना रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की,मुळचा कौळाणे (नि.) ता.मालेगांव येथील रहिवाशी असलेला रमेश निंबा बच्छाव हा काही काळ कळवण तालुक्यातल्या पाळे बु या गावी तलाठी पदावर कार्यरत होता.मात्र अक्कलहुशारीने त्याला बढती मिळाल्याने तो लासलगाव येथे मंडळ अधिकारी या पदावर बढतीने आला होता.मात्र पैसे खाण्याच्या वाईट सवयीमुळे काल अखेर त्याचा शेवट झाला.खडकमाळेगांव ता,निफाड येथील एका महिलेकडून कामाच्या मोबदल्यात साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या अँण्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश निंबा बच्छाव यास रंगेहाथ पकडण्यात येऊन अटक करण्यात आले.
त्यामुळे कौळाणे (निं.) गावात एकच चर्चला उधाण आले आहे.

anews Banner

Leave A Comment