• Home
  • कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा

कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201224-WA0019.jpg

कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे पुन्हा धिंडवडे निघाले आहेत. बुधवारी सकाळी कळंबा कारागृहात 10 मोबाईल, 775 ग्रॅम गांजाचा साठा, 5 चार्जर, 2 पेनड्राईव्हसह सिमकार्ड आढळून आल्याने प्रशासन हादरले आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोघा अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून, दिवसभरात कारागृहांतर्गत सर्वच बॅरेकची चारवेळा झडती घेण्यात आली.
कळंबा कारागृहात गांजा, मोबाईल सापडण्याची सरत्या वर्षातील ही पाचवी घटना आहे. 10 नोव्हेंबरला चेंडूतून कैद्यांना गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला होता.
त्यानंतर दोन मोबाईल आढळून आले. या घटनांचा छडा लागण्यापूर्वीच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता आलिशान मोटारीतून आलेल्या संशयितांनी कापडात गुंडाळलेल्या तीन पुडक्यांतून कैद्यांना मोबाईलसह गांजा व अन्य साहित्य भिंतीपलीकडू आत फेकून पुरविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, मध्यरात्री मोटारीतून दोन संशयित कळंबा कारागृहालगत उजव्या बाजूच्या संरक्षक भिंतीजवळ आले. पांढर्‍या कापडात गुंडाळलेली तीन पुडकी भिंतीवरून कारागृहात फेकून दोघे पसार झाले. हा प्रकार बुधवारी सकाळी सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आला. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांना याबाबत माहिती दिली.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment