• Home
  • 🛑 पाकिस्तानात ७६ वर्षापासून…! मराठमोळे कुटुंब साजरा करत आहे…! गणेशोत्सव 🛑

🛑 पाकिस्तानात ७६ वर्षापासून…! मराठमोळे कुटुंब साजरा करत आहे…! गणेशोत्सव 🛑

🛑 पाकिस्तानात ७६ वर्षापासून…! मराठमोळे कुटुंब साजरा करत आहे…! गणेशोत्सव 🛑
✍️ पाकिस्तान 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कराची :⭕महाराष्ट्रासह देशभरात सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.

यंदा कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर जाणवत असले तरीही सर्वत्र सण आनंदात साजरा होत आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानात देखील गणेशोत्सावाची धूम पाहण्यास मिळत आहे. कराचीच्या जिन्ना मार्गावर 800 पेक्षा अधिक महाराष्ट्रीयन कुटुंब अनेक वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करत आहेत. हा उत्सव महादेव मंदिर, गणेश मठ मंदिर आणि स्वामी नारायण मंदिरात साजरा होतो.

कराचीत गणेशोत्सवाची सुरुवात 76 वर्षांपुर्वी कृष्णा नाईक यांनी केली होती. ते फाळणीनंतर कराचीमध्ये स्थायी झाले होते. कृष्णा यांच्यानंतर त्यांचा मुलगा राजेश नाईक व त्यानंतर आता नवीन पिढी ही परंपरा पुढे चालवत आहे.

कराचीमधील सोशल एक्टिव्हिस्ट आणि कराची मराठी कम्यूनिटीचे सदस्य विशाल राजपूत म्हणाले की, या उत्सवात सहभागी झाल्यानेच आम्हाला विश्वास मिळतो की बाप्पा आम्हाला सुरक्षित ठेवत आहे. याच कारणामुळे संपुर्ण पाकिस्तानात सर्वाधिक भाविक कराचीमध्येच एकत्र येतात.

पाकिस्तानात गणेशोत्सवाची परंपरा सुरु करणारे कृष्णा नाईक यांचा मुलगा राजेश स्वतः ऑर्डर घेऊन मुर्ती बनवून देतात. आता भाविक देखील घरीच मुर्ती तयार करतात.

दुबईवरून देखील मोठ्या प्रमाणात मुर्त्या मागवल्या जातात. मात्र यंदा कोरोनामुळे यावर परिणाम झाला.

विशाल राजपूत यांनी सांगितले की, कराचीत मोठ्या प्रमाणात हिंदू राहतात. दरवर्षी एमए जिन्ना मार्गावरून गणपतीची मिरवणूक निघते व आतापर्यंत कधीही दोन समुदायामध्ये वाद झालेला नाही. भारत-पाकिस्तानमध्ये कधीही तणावाची स्थिती झाली, तरीही याचा येथे काहीही परिणाम होत नाही. येथील मुस्लिम कुटुंब देखील उत्सवात सहभागी होतात.⭕

anews Banner

Leave A Comment