Home सामाजिक किल्ले राजगडावर अनेक वर्षापासून लपलेला चोर दरवाजा सापडला

किल्ले राजगडावर अनेक वर्षापासून लपलेला चोर दरवाजा सापडला

207
0

राजेंद्र पाटील राऊत

किल्ले राजगडावर अनेक वर्षापासून लपलेला चोर दरवाजा सापडला

किल्ले राजगड (ता. वेल्हे) येथे पाली या राजमार्गावरुन गेल्या नंतर पाली दरवाजा बुरुजात अनेक वर्षापासून लपलेला चोर दरवाजा दगड मातीने बुजला होता. सह्याद्री प्रतिष्ठानचा ग्रुप किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता, यावेळी निर्दशनास आल्यानंतर हा दरवाजा पुर्ववत खुला करण्यात आल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.
सर्व गडांचा राजा व राजांचा गड राजगड. रयतेच स्वराज्य स्थापन करुन स्वराज्याचा सर्वाधिक काळ राजधानी राहिलेला व छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक सहवास लाभलेल्या राजगड परिसरात आजही अनेक शिवकालीन वस्तू व वास्तुंचे दर्शन होत असल्याने राजगडावर पर्यटकांची सख्या वाढत चालली आहे.
हजारो पर्यटक, शिवप्रेमी संघटना किल्ल्यावर येत असतात त्यापैकी एक सह्याद्री प्रतिष्ठानचा ग्रुप नुकताच राजगडावर आला होता. पाली दरवाजा बुरुज परिसरात फिरत असताना बुरुजावर दगड दिसले हि दगडे व माती बाजुला केल्यानंतर एक चोर दरवाजा दिसला. राजगडाच्या पाली दरवाज्याच्या सुरक्षततेसाठी उभारण्यात आलेल्या बुरुजात असलेला चोर दरवाजा काळाच्या ओघात बुजला होता.
बुरुजावरील सात ते आठ मोठ्या दगडी व माती बाजूला केल्यानंतर ३ फुटी उंचीचा व २ फुट रुंदीचा चोर
दरवाजा पुर्ववत केला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा व सोलापुर जिल्ह्यातील मावळे उपस्थित होते.
किल्ले राजगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व पर्यटक निवासस्थान दुरुस्ती शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यासाठी संग्रहालय, यांची कामे सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे निधी न मिळाल्याने हि कामे थांबली आहेत.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा
Next articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here