Home महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली

96
0

राजेंद्र पाटील राऊत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून आतापासून नियोजन, रणनीती आखून कामाला सुरुवात केलेली आहे.
राज्यात २०२१ मध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या पाच मोठ्या व महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका होत आहेत. तर दोन जिल्हा परिषदा, १३ नगर परिषदा व ८३ नगर पंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १३ सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे.
तसेच या सर्व निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षकांच्या नेमणुकाही केल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या १२ मंत्र्यांकडेही संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी सुरेश भोयर – भंडारा, विशाल मुत्तेमवार – गोंदिया यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मोहन जोशी, राहुल दिवे, शीतल म्हात्रे; औरंगाबाद जिल्ह्यासाठी मुजफ्फर हुसेन, किशोर गजभिये, दादासाहेब मुंडे; पालघर जिल्ह्यासाठी राजेश वर्मा, मेहुल होरा, डॉ, गजानन देसाई; कल्याण डोंबिवलीसाठी मधू चव्हाण, अरविंद शिंदे, आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभय छाजेड, रणजीत देशमुख, पृथ्वीराज साठे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकिल्ले राजगडावर अनेक वर्षापासून लपलेला चोर दरवाजा सापडला
Next articleसरपंच आरक्षण सोडतीला विरोध हायकोर्टात याचिका दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here