• Home
  • 🛑 महाराष्ट्रात पावसाची काय अपडेट 🛑 ✍️रत्नागिरी ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 महाराष्ट्रात पावसाची काय अपडेट 🛑 ✍️रत्नागिरी ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 महाराष्ट्रात पावसाची काय अपडेट 🛑
✍️रत्नागिरी ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी : ⭕ राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तळकोकणात सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गाव-पाड्यावरील नदी नाले दुथड्या भरून वाहत आहेत .सखल भागांमध्ये पाणी साचले असून सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर पावसाची बॅटिंग सुरू असून, येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर आजही कायम आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात पडत असणाऱ्या पावसाने पंचगंगा, भोगावती, कुंभी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 तासापासून तिथे मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाने महाराष्ट्रातला अनेक भागात हजेरी लावल्याने कुठे खुशी कुटे गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment