Home जळगाव खेळातून सांघिक भावना वाढीस लागते – संपदाताई पाटील…

खेळातून सांघिक भावना वाढीस लागते – संपदाताई पाटील…

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_185454.jpg

खेळातून सांघिक भावना वाढीस लागते – संपदाताई पाटील…
——————————-
गोल्डन इलेव्हन जळगावने जिंकली खासदार चषक क्रिकेट स्पर्धा…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- सध्याच्या डिजिटल युगात आरोग्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. निरोगी आयुष्यासाठी आवडीचा खेळ खेळणे,व्यायाम करणे गरजेचे असून क्रिकेट स्पर्धेतून आपले आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते आहे.
त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धेतून मोबाईलमुळे दुरावलेली माणसे एकत्रित येत असल्यानं सांघिक भावना वाढीस मदत होत असल्याचे प्रतिपादन उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका सौ संपदा उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले.
चाळीसगाव येथील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणावर संपन्न झालेल्या खासदार चषक 2023 या स्पर्धेचा बक्षीस वितरण सौ . संपदा उन्मेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे तर भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दिनेश बोरसे, उपसभापती सुनील पाटील, डॉ.सि टी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, निलेश कांकरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पाच दिवसांपासून खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रायोजकत्वातून ही स्पर्धा भरविण्यात आली. या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून 32 संघांनी सहभाग नोंदवला. यात चाळीसगाव,चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर ,भुसावळ ,वरणगाव ,फैजपूर, पारोळा, भडगाव येथील संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा अंतिम सामना दि 27 रोजी खेळविण्यात आला.
चुरशीच्या सामन्यात खासदार प्रायोजित 71 हजार रुपये प्रथम बक्षीस व आकर्षक चषक जळगाव येथील गोल्डन इलेव्हन संघाने पटकावले संपदाताई पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाचे संघ मालक फिरोज पठाण यांना पारितोषिक देण्यात आले.
खासदार प्रायोजित द्वितीय बक्षिस 41 हजार रूपये आझाद इलेव्हन संघाचे कर्णधार बबलू अजबे यांनी तर निलेश कांकरिया प्रायोजित तृतीय बक्षीस व चषक सी. टी. केयर संघाचे कर्णधार शैलेश दिघोळे यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन स्वार, अरविंद गोत्रे, प्रशांत ठाकूर यांनी परिश्रम घेतले.विक्की खैरनार,निलेश अजबे, विनोद खैरनार, एकनाथ ठाकूर, प्रशिक चव्हाण, सुरज पाटील, संदीप राठोड, पंकज देशमुख, बबलू चव्हाण, अभिषेक देशमुख यांनी पाच दिवस स्पर्धेसाठी परीश्रम घेतले. स्पर्धेसाठी पंच प्रशांत ठाकूर, धनंजय चव्हाण सर, योगेश बेलदार तर गुणलेखक शैलेश पवार, प्रतिक गवळी, उमेश सोनवणे यांनी तर स्पर्धेचे समालोचन फिरोज पठाण, सचिन स्वार, विनोद खैरनार,प्राचार्य मंदार नेरकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सचिन स्वार यांनी मानले. सर्व स्पर्धेचे युट्युब लाईव्ह प्रक्षेपण शुभम पाटील, गोपाल चव्हाण, कल्पेश पाटील यांनी केले.

Previous articleचोरीची कार छत्रपती संभाजीनगर येेेथून जप्त
Next articleचाळीसगांव शहरात अवैधरित्या दारु विक्री तसेच सट्यांचे आकडे घेणाऱ्यांवर कारवाईचा हातोडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here