Home जळगाव चाळीसगांव शहरात अवैधरित्या दारु विक्री तसेच सट्यांचे आकडे घेणाऱ्यांवर कारवाईचा हातोडा

चाळीसगांव शहरात अवैधरित्या दारु विक्री तसेच सट्यांचे आकडे घेणाऱ्यांवर कारवाईचा हातोडा

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_185844.jpg

चाळीसगांव शहरात अवैधरित्या दारु विक्री तसेच सट्यांचे आकडे घेणाऱ्यांवर कारवाईचा हातोडा
चाळीसगांव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीसांनी शहरात बस स्टँण्ड परिसरात काही इसम अवैधरित्या दारु विक्री तसेच मट्नयाचे आकडे घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.पोलीसांनी वर्षभरात दारूबंदी कायद्यान्वये 113 केसेस करून 6 लाख 59 हजार 28 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला तर 5 गुटख्याच्या गुन्ह्यात 7 जणांवर कारवाई करून 1 कोटी 13 लाख 2 हजार 594 रूपये किमतीचा गुटखा जप्त केला.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, बस स्थानक परिसरात अवैधरित्या दारू तसेच मटका जुगार खेळला जात आहे. पोलीसांनी या ठिकाणी कारवाई करून अवैधरित्या दारु विक्री करणारे शेख रमजु शेख वजीर (55) रा. सुवर्णाताई नगर, चाळीसगांव याच्या ताब्यात 5 हजार रुपये किमतीची देशी व हातभट्टीची दारु तर वाल्मीक छोटु शिंपी रा. शाहुनगर याचे ताब्यातुन 3900 रुपये किमतीची देशीदारु व गावठी हातभट्टीची दारु मिळुन आली आहे. दोघांना ताब्यात घेवुन त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.
तर बसस्टँण्ड परिसरातच विना परवाना गैरकायदा लोकांकडुन सट्ट्याचे आकडे व रोख पैसे स्विकारुन कल्याण नावाचा मटका जुगार खेळवणारे राहुल वसंत पवार रा. नेताजी चौक व निलेश मनोज सुर्यवंशी यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडुन सट्टा जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम 7350 रूपये असा ऐवज जप्त करण्यात आला.त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
वर्षभरात कारवाईचा बडगा
2023 या वर्षात चाळीसगांव शहर पोलीस ठाण्यातर्फे व्यसनमुक्त चाळीसगांव ही मोहीम राबविण्यात आली. या वर्षात दारुबंदी कायद्यान्वये एकुण 113 गुन्हे दाखल करून 119 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात 6 लाख 5 हजार 28 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 5 प्रतिबंधीत गुटख्याचे गुन्हे दाखल होवून 7 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन 1 कोटी 13 लाख 2 हजार 594 रुपये किमतीचा पान मसाला, सुगंधीत सुपारी, विमल गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्याचप्रमाणे वर्षभरात 7 एनडीपीएस काद्यान्वये अंमली पदार्थाबाबत कारवाई करुन 11 आरोपीतांना अटक करुन त्यांचेकडुन 21लाख 10 हजार 850 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
येत्या वर्षात सदर कारवाई झालेल्या इसमांवर पुर्वीचा अभिलेख तपासुन एमपीडीएA सारखी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सदर आरोपीतांना 1 वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

Previous articleखेळातून सांघिक भावना वाढीस लागते – संपदाताई पाटील…
Next articleसायगावला वाळूची थप्पी करून डंपरने वाहतुक महसूल व पोलीस विभागाची कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here