Home जळगाव सायगावला वाळूची थप्पी करून डंपरने वाहतुक महसूल व पोलीस विभागाची कारवाई

सायगावला वाळूची थप्पी करून डंपरने वाहतुक महसूल व पोलीस विभागाची कारवाई

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_190306.jpg

सायगावला वाळूची थप्पी करून डंपरने वाहतुक
महसूल व पोलीस विभागाची कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील– गिरणा नदीपात्रातून वाळू चोरीचा वेगवेगळा फंडा वाळू चोरट्यांकडून वापरला जात आहे. तालु्नयातील सायगाव येथे गिरणा नदीपात्रातून बैलगाडीने वाळू वाहतुक करून ती एका ठिकाणी थप्पी केल्यानंतर या वाळूची जेसीबी व डंपरने वाळू वाहतुक करण्याचा प्रकार महसूल व पोलीस विभागाने केलल्या संयुक्त कारवाईत उघडकीस आणला आहे. या कारवाईत डंपर व जेसीबी जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव विभागाचे प्रांतधिकारी प्रमोद हिले आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांना गुप्त माहिती मिळाली की, सायगाव येथे डोंगर भागात आडोशाला वाळूची बैलगाड्यांद्वारे थप्पा मारून ही वाळू भरण्यासाठी एक जेसीबी व डंपर येत आहे.या माहितीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, एएसआय मिलींद शिंदे, पोकॉ गोरख चकोर, निलेश लोहार, जितु परदेशी तसेच महसूल विभागाचे बहाळ मंडळाधिकारी झाडे, तलाठी सचिन हातोळे, राहूल आल्हात, गणेश गढरी, पवन शेलार, घनशाम बागूल, कोतवाल सागर बागूल यांच्या पथकाने रात्री छापा टाकला असता तेथे जेसीबी, डंपर असे अवैध वाळू भरतांना मिळून आले. जेसीबी व डंपर चालकांकडे वाळू वाहतुकीबाबत पथकाने विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याने पथकाने हे जेसीबी व डंपर जप्त करून मेहूणबारे पेालीस ठाण्यात जमा केले.या कारवाईचा अहवाल दंडात्मक कारवाई कामी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हे डंपर माणिक किसन नागरे रा. मनमाड यांच्या मालकीचे असून डंपर चालक मोहन बापू शरमाळे रा. बोळे ता. नांदगाव तर जेसीबी चालक अस्लम खान रा. मनमाड यांच्या मालकीचे असल्याने महसूल व पोलीस विभागाने सांगितले.

Previous articleचाळीसगांव शहरात अवैधरित्या दारु विक्री तसेच सट्यांचे आकडे घेणाऱ्यांवर कारवाईचा हातोडा
Next articleसोनई महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here