• Home
  • ऑनलाइन वर्गांबाबत नियोजन करण्याची मागणी

ऑनलाइन वर्गांबाबत नियोजन करण्याची मागणी

🛑 ऑनलाइन वर्गांबाबत नियोजन करण्याची मागणी 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 10 जून : ⭕लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने निर्देश दिले आहेत. हे वर्ग ऑनलाइन भरविण्यात येणार आहेत. मात्र ऑनलाइन वर्गाला विविध मर्यादा आहेत त्या लक्षात घेऊन नियोजन करण्याची विनंती युवा सेनेने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केली आहे.

युवा सेनाप्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या या पत्रात ऑनलाइन शिक्षण सत्रांचा कालावधीत अनेक शाळांमध्ये असमानता दिसून येत असल्याचे म्हटले आहे. प्राथमिक शाळेच्या मुलांचे ऑनलाइन सत्रही जादा तासांचे आयोजित करण्यात आले आहेत. तरी शालेय शिक्षण विभागाने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्येक इयत्तेसाठी एकसमान ऑनलाइन सत्र कालावधी निश्चित करावे असे युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि युवा सेना मध्यवर्ती समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच सध्याच्या कोविड संकटामुळे निम्न मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांना आर्थिक फटका बसला असून एकापेक्षा अधिक मुले असणाऱ्या पालकांची चिंता अधिक वाढली आहे. म्हणून अशावेळी या पालकांना स्मार्टफोन व इंटरनेट जोडणी खरेदी करणे परवडत नसल्यामुळे शाळांकडून काही योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, हा मुद्दाही यापत्रात निदर्शनास आणून दिला आहे. याचबरोबर दोन्ही पालक कामावर जाणारे असतील अशा पालकांना ऑनलाइन शिक्षणाची सक्ती करू नये व सत्रांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून पालकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्याची व्यवस्था करावी अशी सूचनाही या पत्राद्वारे केली आहे. या सुचनांवर योग्य ते उपाययोजना करून परिपत्रक जारी करावे अशी विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment