• Home
  • भाडे द्या नाहीतर दुकाने रिकामीकरा

भाडे द्या नाहीतर दुकाने रिकामीकरा

🛑 भाडे द्या नाहीतर दुकाने रिकामीकरा! 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद:⭕ लॉकडाऊनमध्ये व्यापारी, दुकानदारांचा व्यवसाय पुर्णपणे बुडाला, बहुतांश जणांचा वर्षभराचा सिझन गेला. आता पुढील आठ महिने कसे काढावे या चिंतेत अनेक जणांना झोप येत नसतांना आता ज्यांची दुकाने भाड्याने आहे त्यांना मालकांकडून भाडे देण्यासाठी विचारणा केली जात आहे. भाडे तर द्यावेच लागेल नाही तर दुकान रिकामे करा असे फर्मान काही जण सोडत आहेत तर काही मालकांनी मन मोठे करुन लॉकडाऊनच्या काळातील दुकानांचे संपुर्ण भाडेच माफ केले. करारानुसार काही दुकानांची दहा ते पंधरा टक्के दरवर्षी भाडेवाढ असते. ती सुद्धा दुकानदारांना आर्थिक संकटात नेणारी आहे.

चाळीस ते पन्नास टक्के दुकाने भाड्याने

शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील जवळपास चाळीत ते पन्नास टक्के दुकाने भाडेतत्त्वावर आहेत.
साधरपणे दहा ते पन्नास हजार तर काही ठिकाणी हे लाखात सुद्धा आहे. मात्र लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून दुकाने बंद आहे. विशेष म्हणजे कपडा, कुलर, आईसक्रीम, ज्युस, फर्निचर अशा अनेक व्यावसायिकांचा सिझन गेला आहे. दुकान मालकांनी हे भाडे माफ करावी अशी माफक अपेक्षा दुकानदारांची आहे. मात्र भाडे तर द्यावेच लागणार नाही तर दुकान रिकामे करा, अनेकजण ते घेण्यास तयार आहे असे निरोप दुकानदारांना मालकांकडून मिळत आहे. तथापि, काही दुकानदारांनी पूर्ण तर काहींनी २५, ५० टक्के भाडे माफ करण्याचीही तयारी दर्शविली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment