Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न

सोनई महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न

73
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_190609.jpg

सोनई महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न…          नेवासा ,,,(कारभारी गव्हाणे)-मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई येथे दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी ठीक १०:०० वाजता मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांतभाऊ गडाख पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानात उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, डॉ.अशोक तूवर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम प्रमुख डॉ. बाळासाहेब खेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विज्ञान भवनच्या समोरील बाजूस देखील वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये एकूण २१ विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. राजेश वाघ, प्रा. तुकाराम जाधव , प्रा. शिंदे बी एल, प्रा.शरद औटी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here