Home गडचिरोली महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे.:- सौ. योगिताताई पिपरे

महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे.:- सौ. योगिताताई पिपरे

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_052818.jpg

महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे.:- सौ. योगिताताई पिपरे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत गोकुलनगर येथे भव्य महिला शिबीर,व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

गडचिरोली,(सुरज गुंडमवार):-

केंद्र आणि राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत,या योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा. महिला बचत गट सक्षम होण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायात महिलांनी स्वयंपूर्ण बनाव याकरिता शासनाकडून विनातारण कर्ज उपलब्ध केला जात आहे,त्यामधून शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांनी लहान-मोठा उद्योग निर्माण करावा जेणेकरून महिलांचा सक्षमीकरण होण्यास मदत होईल. याकरिता महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.

नगरपरिषद गडचिरोली यांच्या वतीने गोकुलनगर येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना योगीताताई पिपरे बोलत होत्या.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनीताई धात्रक, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,माजी नप सभापती मुक्तेश्वर काटवे,शिवसेना विदर्भ संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे,माजी नगरसेवक केशव निंबोळ,माजी नगरसेविका निताताई उंदिरवाडे, माजी नगरसेविका विमलताई चिमुरकर,नप मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर,शिवसेना महिला आघाडीच्या निताताई वड्डेटीवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिलाताई मेश्राम, पुष्पाताई करकाड़े,वरघंटीवारताई,शेख ताई,अर्चना निंबोळ,ज्योती बागडे तसेच मोठया संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध योजनांचे स्टॉल लावलेले होते.लाभार्थी महिलांना विविध योजना अंतर्गत लाभांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी रांगोळी स्पर्धा,एकल नृत्य,समूह नृत्य,तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार तर संचालन वंदना गेडाम व आभार नाईक यांनी मानले. यशस्वीतेसाठी नगरपरिषदेतील अधिकारी,कर्मचारी तसेच नपशाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Previous articleआखेर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत लेंडी धरणग्रस्त संघर्ष समितीची बैठक संपन्न
Next articleदेलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here