Home माझं गाव माझं गा-हाणं जि. प. प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व...

जि. प. प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

230
0

राजेंद्र पाटील राऊत

जि. प. प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  सटाणा( जगदिश बधान युवा मराठा न्युज नेटवर्क)-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे आज दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी  क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जगदीश बधान यांच्या हस्ते ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री .जगदीश बधान यांचेकडून शाळेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जगदीश बधान, उपाध्यक्ष श्री.नारायण पांगा माळी, दीपक आबा पवार ,शांताराम लोणारे,शाळेचे मुख्याध्यापक श्री पगारे सर, विधाते सर व भामरे सर यांनी शाळेतील महिला शिक्षिका सुरेखा देवरे ,छाया सूर्यवंशी, प्रतिभा कापडणीस, प्रतिभा शार्दुल, सविता रौंदळ, रोहिणी सोनवणे ,भाग्यश्री देवरे व माधुरी पवार यांचा सत्कार केला व त्यांचा गुणगौरव केला. *सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.*
याप्रसंगी सर्व महिला शिक्षकांनी कोरोना काळात केलेल्या ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण कार्याचा मुख्याध्यापकांनी गौरव केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व महिला शिक्षीकांनी आपले शैक्षणिक कार्य प्रभावीपणे राबविण्याचे मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here