Home भंडारा वृद्ध आई वडीलांची काळजी घ्यावी – ॲड. महेंद्र गोस्वामी

वृद्ध आई वडीलांची काळजी घ्यावी – ॲड. महेंद्र गोस्वामी

70
0

आशाताई बच्छाव

IMG_20231107_061040.jpg

वृद्ध आई वडीलांची काळजी घ्यावी – ॲड. महेंद्र गोस्वामी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी):- दिवसेंदिवस वृद्धाश्रम, हेल्पेज होम, अनाथाश्रमांची संख्या वाढत असून आपल्या आई वडीलांची काळजी मुला मुलींनी न घेतल्याने हे घडत आहे.त्यामुळे मुला मुलींनी आपल्या वृद्ध आई वडीलांची काळजी घेवून त्यांची सेवा सश्रृषा करावी, असे आवाहन ज्येष्ठांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड.महेंद्र गोस्वामी यांनी व्यक्त केले.

पवनी विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश एम.बी.जाधव हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विधिज्ञ ॲड. महेंद्र गोस्वामी, ॲड.शरद सावरकर हे होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना न्यायाधीश जाधव यांनी कायदेविषयक शिबिरात मिळणारी कायद्याची माहिती व संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी ॲड.सावरकर यांनी देखील मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत ॲड.अंबादे, ॲड.अनील देशमुख, ॲड.जिभकाटे, सरकारी वकील सौ.रामटेके, ॲड.काटेखाये, ॲड.तुळसकर, ॲड.गजभिये, ॲड. श्रद्धा कामथे हे होते. तसेच न्यायालयातील वकील, कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिराचे संचालन व प्रास्ताविक ॲड.योगीराज सुखदेवे यांनी केले.तर आभार प्रदर्शन ॲड. बनारसे यांनी केले.

Previous articleपाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  
Next articleविज्ञानाने घडतो माणूस!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here