Home Breaking News भाग्यवान व-हाणेकरांच्या नशिबी दोन -दोन ग्रामसेवक? कागदोपत्री लबाडीचे कारस्थान!!

भाग्यवान व-हाणेकरांच्या नशिबी दोन -दोन ग्रामसेवक? कागदोपत्री लबाडीचे कारस्थान!!

58
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20230119-202951_Facebook.jpg

भाग्यवान व-हाणेकरांच्या नशिबी दोन -दोन ग्रामसेवक? कागदोपत्री लबाडीचे कारस्थान!!
राजेंद्र पाटील -राऊत
मालेगांव- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्याच्या व-हाणे गावात दोन दोन ग्रामसेवक कार्यरत धक्कादायक कारभार चव्हाटयावर आला असून,त्याबाबत आज गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करुन चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,व-हाणे गावात आज रोजी ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे याच कार्यरत असून,माहे आँक्टोबर २०२२ पासून काही काळासाठी त्यांना रजेवर पाठविले असल्याची चर्चा असतानाच,आता मात्र ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांची मुख्यालयात अर्थात पंचायत समितीत नेमणूक असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात श्रीमती सुवर्णा सांळुखे या पंचायत समितीत कधीही दिसून आलेल्या नाहीत किंवा उपस्थित नसतात.एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की,सुवर्णा सांळुखे या व-हाणे येथेच कार्यरत आहेत.मग त्यांचे जागेवर नोकरी करणारे हेमंत शिरसाठ हे व-हाणे गावी कोणत्याही लेखी आदेशाशिवाय कुणाच्या आशिर्वादाने काम करीत आहेत.? हेमंत शिरसाठ यांची व-हाणे गावासाठी शासकीय पातळीवर अधिकृतरित्या नेमणूकच नसल्यामुळे त्यांनी व-हाणे गावात कोणाच्या संगनमताने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी ग्रामसभा घेतली.जर शिरसाठ यांची व–हाणे गावात नेमणूकच नाही तर मग  बेकायदेशीर ग्रामसभा घेऊन खोटया स्वरुपाचे कागदपत्रे बनविण्याचा अनैतिक अधिकार शिरसाठ यांना कुणी दिला? सगळ्याच बाबतीत कागदोपत्री खोटेपणा करणाऱ्या व-हाणे ग्रामपंचायत प्रशासनाचा आणखी हा एक लबाडीचा कारनामा चव्हाट्यावर आला आहे.यापूर्वी सुवर्णा सांळुखे कार्यांकाळात ग्रामसभेच्या प्रोसिंडीगवर खोटया सहया करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता  व-हाणे ग्रामपंचायतीला शिरसाठ यांची अधिकृतपणे  नेमणूक नसताना शासकीय दस्त व बनावट कागदपत्रे बनविण्याचा नैतिक अधिकार या ग्रामसेवकांना कुणी दिला? एक तर ग्रामसेवक सुवर्णा सांळुखे ह्याच जर व-हाणेत कार्यरत आहेत,तर मग हेमंत शिरसाठ यांना कागदोपत्री लुडबूड करण्याचा नैतिक अधिकार आहे का?त्यासाठी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेमणूकीचे लेखी आदेश शिरसाठ यांना आहेत.याचाही खरे तर आता पंचनामा होईल,व खोटया कागदपत्रांच्या कारनाम्यात सहभागी असलेल्या शिरसाठ यांनाही आता बळीचा बकरा म्हणून सामोरे जावे लागेल.एक मात्र खरे की,व-हाणेतील सुरु असलेल्या दोन वर्षापासूनच्या प्रकरणात “हम तो डुबेंगे सनम तुम्हे भी लेकर” असाच काहीसा प्रकार आता समोर येणार आहे!

Previous articleदेवळा तहसिल समोर फुलेवामाळवाडीच्या नागरिकांचे उपोषण आंदोलन
Next articleभूमिहीन शेतमजुराचा मुलगा ते आरोग्य उपसंचालक या पदापर्यंत प्रवास…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here