Home Breaking News जिल्ह्यात 2373 कोरोनामुक्त, 1915 रुग्णांवर उपचार सुरू* औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) :...

जिल्ह्यात 2373 कोरोनामुक्त, 1915 रुग्णांवर उपचार सुरू* औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2373 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1915 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 223 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली.

78
0

*जिल्ह्यात 2373 कोरोनामुक्त, 1915 रुग्णांवर उपचार सुरू*
औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2373 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1915 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 223 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 127 आणि ग्रामीण भागातील 96 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 128 पुरूष आणि 95 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 4522 आढळले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज सायंकाळनंतर 12 कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये 06 पुरूष आणि 06 महिला आहेत. औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. रामकृष्ण नगर, गारखेडा परिसर (1) आरेफ कॉलनी (1), कैसर कॉलनी (1), राजा बाजार (1), अजिज कॉलनी , नारेगाव (1), गल्ली क्रमांक 27, बायजीपुरा (1), बजाज नगर (2), रेल्वे स्टेशन परिसर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
*ग्रामीण भागातील रुग्ण*
ग्रामीण भागात जाळे बोरगाव, खुल्ताबाद (1), वाळूज (1) सलामपुरा नगर, वडेगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
*आज 80 जणांना सुटी*
एकूण 80 कोरोनाबाधित रुग्णांना आज सुटी देण्यात आलेली आहे. या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत 68, उर्वरीत 12 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
*दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयामध्ये (घाटी) 24 जून रोजी रोशन गेट येथील 68 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीमध्ये आतापर्यंत एकूण 177 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 174 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात वैजापुरातील 43 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 174, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 59, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 234 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. ***

Previous articleनांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास १३ कोविड पाॕझेटिव्ह रुग्णांची भर तर ३ रूग्ण मुक्त, व २ रूग्णांच्या मृत्यूची नोंद – नांदेड_दि. २६ ; राजेश एन भांगे
Next article१९९३ मुंबईत साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी – युसूफ मेमन नाशिक कारागृहात मृत्यु झाला! ✍️नाशिक ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here