• Home
  • नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास १३ कोविड पाॕझेटिव्ह रुग्णांची भर तर ३ रूग्ण मुक्त, व २ रूग्णांच्या मृत्यूची नोंद – नांदेड_दि. २६ ; राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास १३ कोविड पाॕझेटिव्ह रुग्णांची भर तर ३ रूग्ण मुक्त, व २ रूग्णांच्या मृत्यूची नोंद – नांदेड_दि. २६ ; राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास १३ कोविड पाॕझेटिव्ह रुग्णांची भर तर ३ रूग्ण मुक्त, व २ रूग्णांच्या मृत्यूची नोंद – नांदेड_दि. २६ ; राजेश एन भांगे

कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 2 आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 असे एकूण 3 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज 2 पॉझिटीव्ह बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमर कॉलनी येथील 54 वर्षाचा 1 पुरुष व गुलजार बाग नांदेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुषांचा यात समावेश आहे. हे दोन्ही बाधित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार घेत होते. दोन्ही बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. जिल्ह्यात आतापर्यत कोरोनामूळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार 26 जून 2020 रोजी सायंकाळी 5 : 00 वाजता प्राप्त झालेल्या एकुण 79 अहवालापैकी 79 अहवाल निगेटिव्ह प्राप्त होते व एकही नवीन पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आला नव्हता, पण रात्री उशीरा 9 वाजता आणखी 19 अहवाल प्राप्त झाले ज्यामध्ये 6 निगेटिव्ह व 19 रुग्ण पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 344 एव्हढी झाली आहे.

रात्री उशीरा आढळून आलेल्या 13 पॉसिटीव्ह रुग्णांमध्ये 2 पुरुष एक 3 व 6 वर्षीय बालक/बालिका व 9 महिलांचा समावेश आहे ज्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

⭕️सुशील बुक जवळ, शिवाजी नगर नांदेड येथील एक पुरुष रुग्ण वय : 62.

⭕️बोरबन फॅक्टरी, एक महिला रुग्ण वय : 55

⭕️गोकुळ नगर, एक महिला रुग्ण वय : 58

⭕️बिलाल नगर एक महिला रुग्ण वय : 06

⭕️तकबीड, ता. नायगाव एक येथील एक पुरुष रुग्ण वय : 44.

⭕️चंद्रभागा नगर, ता.कंधार एक महिला वय : 44.

⭕️नाथ नगर नांदेड येथील एक महिला वय : 22.

⭕️भगत सिंग रोड येथील एक महिला वय : 52.

⭕️पिरुबुऱ्हाण नगर येथील 3 रुग्ण ज्यात दोन महिला वय : 20 व 19 व तसेच एक 3 वर्षीय बालकाचा समावेश.

⭕️उमर कॉलोनी दोन महिला रुग्ण वय : 60 व 28.

असा आज सापडलेल्या 13 रुग्णांचा एकूण तपशील आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 344 बाधितांपैकी एकूण 270 व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 16 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. औषधोपचार चालू असलेल्या 58 बाधितांपैकी 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय 50 व 55 वर्षाच्या दोन स्त्री व 38, 42, 67 व 75 वर्षाचे चार बाधित पुरुषांचा समावेश आहे. 3 बाधित रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 13 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 344 वर.
☑️ दिवसभरात 3 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 270 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️16 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️58 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 2 महिला 4 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ उपचारास्तव 2 रुग्ण औरंगाबाद 1 सोलापूर
येथे संदर्भीत.

शुक्रवार 26 जून रोजी 109 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

✅️नांदेड आरोग्य विभागाचे महत्वाचे आवाहन!

दरम्यान कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment