आशाताई बच्छाव
अवैध रेती वाहतुकीचे वाहन पकडले
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बूलढाणा
संग्रामपूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कार्यवाहीला सुरुवात. तहसीलदार वरणगावकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांच्या पथकाने आज दिनांक 23/08/ 2022 रोजी सकाळी 10:45 वाजताच्या दरम्यान वरवट बकाल गाव मध्ये अवैद्य रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले असता वाहन चालकाला रॉयल्टी विचारली परंतु रॉयल्टी आढळून आली नसुन सदरचे MH 30 BD 0601क्रमांकाचे (407)वाहनाचा पंचनामा करून वाहन पोलीस स्टेशन तामगाव येथे लावण्यात आले व पुढील दंडात्मक कारवाई करिता तहसीलदार यांच्या कडे प्रकरण दाखल करण्यात आले सदर कारवाई ही प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे मंडळ ,अधिकारी आर आर. बोराखडे ,तलाठी एम एस कूसळकर .अविनाश खरे यांच्या पथकाने केली .अवैद्य रेती चोरी मुळे पर्यावरणाची हानी व शासनाचे राजरोसपणे होणारे नुकसान थांबवण्यासाठी अखेर प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांचे मंडळ मैदानात उतरून रेती माफियांवर कार्यवाहीला सुरुवात करावी लागली.