Home नांदेड मुखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी कोनापूरे तर सचिवपदी अनिल कांबळे यांची...

मुखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी कोनापूरे तर सचिवपदी अनिल कांबळे यांची निवड

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0103.jpg

मुखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी कोनापूरे तर सचिवपदी अनिल कांबळे यांची निवड
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड… अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी दि. २१ आॅगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात करण्यात आली असून या कार्यकारणीत अध्यक्षपदी शिवाजीराव कोनापूरे तर सचिवपदी अनिल कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मुखेड तालुका पत्रकार संघाची २०२१ ते २०२२ या वर्षातील संघटनेचा कार्यकाल संपल्याने २०२२ ते २०२३ या वर्षासाठी नविन कार्यकारणी जेस्ट पत्रकार यशवंतराव बोडके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असून या कार्यकार्णीत अध्यक्षपदी शिवाजीराव कोनापूरे, उपाध्यक्षपदी दयानंद कानगुले, गणेश जाधव, कार्यध्याक्षपदी गंगाधर चामलवाड, सचिवपदी अनिल कांबळे सलगरकर,कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार, संघटक संतोष बेळगे, सल्लागारपदी जेस्ट पत्रकार यशवंत बोडके, अविनाश देशमुख, ॲड.सुनिल पौळकर, किशोरसिंह चौव्हाण, किशोर संगेवार, दत्तात्रय तिपणे, विजय पांपटवार यांची तर सदस्य म्हणून चरणसिंग चौव्हाण, बालाजी शिंदे, मनोज बिरादार,अविनाश घाटे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल आ. डाॅ. तुषार राठोड, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मा.आ. अविनाशजी घाटे,मार्केट कमेटिचे सभापती ॲड. खुशालराव पा.उमरदरीकर मा. जि.प.सदस्य दशरथ लोहबंदे, शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.विरभद्र हिमगिरे, डॉ.माधव पा.उच्चेकर, डॉ. रामराव श्रीरामे, यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. या निवडीच्या वेळी पत्रकार संघतील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. बिनविरोध निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

Previous articleअवैध रेती वाहतुकीचे वाहन पकडले
Next articleसिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मेन रोडची दैनिय अवस्था यांची दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश खा.अशोकजी नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here