Home नांदेड मुखेड तालुक्याचे ८०• ७६ टक्के मतदान आता लक्ष्य निकालाची उत्सुकता..

मुखेड तालुक्याचे ८०• ७६ टक्के मतदान आता लक्ष्य निकालाची उत्सुकता..

114
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्याचे ८०• ७६ टक्के मतदान आता लक्ष्य निकालाची उत्सुकता..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
(युवा मराठा न्यूज नेटवर्क )मुखेड तालुक्यातील १०२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत८०•७६ टक्के मतदान झाले मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागली होती. यात सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने १०२ ग्रामपंचायत साठी दि.१५ जानेवारी २०२१रोजी मतदान पार पडले. यात पुरुष मतदान ६५हजार ५९२तरी स्त्री मतदार ५९हाजार२७१ अशी एकूण १ लाख २४हजार ८६३मतदारांनी आपला हक्क बजावला. तालुक्यातील टक्केवारी ८०% टक्केच्या वर गेल्याने मतदार उत्साही असल्याचे चित्र दिसून आले. तर उपविभागीय अधिकारी शक्ती कदम तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडल्या . पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर साहेब यांनीसुद्धा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निवडणुकीच्या कामासाठी नायब तहसीलदार एस एस मामीलवाड महेश हांडे लिपिक प्रशांत लिंबेकर संदीप भुरे
यासह अनेक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here