Home गडचिरोली मानव विकास योजनांमधुन दारिद्र्य निर्मलन शक्य।

मानव विकास योजनांमधुन दारिद्र्य निर्मलन शक्य।

57
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0006.jpg

मानव विकास योजनांमधुन दारिद्र्य निर्मलन शक्य।                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मानव विकार कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना गरिबातील गरिब, अंशत: असुरक्षीत आदिवासी गट (PVGT) तसेच दिव्यांग एससी एसटी लोंकांना मिळाव्यात,यातून खर्या अर्थाने द्रारिद्र निर्मूलन शक्य आहे असे मत नितीन पाटिल आयुक्त, मानव विकास आयुक्तालय यांनी व्यक्त केले.ते गडचिरोली जिल्ह्यात सहा दिवसीय दौर्यावर आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी मानव विकास कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात येणाऱ्या विविध अंमलबजावणी यंञणाचा आढावा घेतला,यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा,मुंख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशिर्वाद, मानव विकास,जिल्हा नियोजन अधिकारी टेंभूर्ने आणी संबधित विभागांचे सर्व विभाग प्रमुख उपस्थितीत होते.

मानव विकास मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्यास शाश्वत विकास ध्येयांपैकी द्रारिद्र्य निर्मूलन व उपासमारीचे समुल उच्चाटन साध्य करणे अधिक सोपे होईल असे त्यांनी बैठकीत सांगीतले.

बैठकिच्या सुरूवातीस जिल्हातील मानव विकास मिशन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसेसची माहीती घेतली.जिल्हात प्रती तालुका 07 बसेस प्रमाणे 77 बसेस पुरविण्यात आला असुन त्याचा वापर 12 पर्यंतच्या मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी होत असल्याचे विभागीय व्यवस्थापक (MSRTC) _यांनी सांगीतले.

कोरची,कुरखेडा,धानोरा,एटापल्ली, अहेरी,भामरागड व सिरोंचा या तालुक्यामध्ये इंटनेट सुविधा पुरविण्याकरिता निधी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी बैठकित मागणी केली. शिक्षण,आरोग्य व उत्पन्न वाढिसाठीच्या विविध योजनांनासाठी मुंख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी निधिची आवश्यकता असल्याचे नमुद केले. उत्पन्न वाढिच्या विविध योजनांकरीता जिल्हातील प्रती तालुका दोन कोटि रुपये प्रमाणे येत्या काळात निधी उपलब्ध होणार असल्याचे आयक्ताने बैठकित सांगीतले.

अहिल्याबाई होळकर योजना व मानव विकास कार्यक्रमातुन लाभ देतांना समन्वय साधण्याबाबत शिक्षणाधिकारी ( माध्य) जि.प.यांना सुचना दिल्या आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सायकल वाटप योजना राबविल्या जाते, मानव विकासाचे तिन्ही निर्देशांक पुर्ण करणारी योजना असल्याने जास्तीत जास्त मुलिंना याचा लाभ देण्याबाबत सुचना त्यांनी यावेळी दिल्या.लाभार्थी निवड करतांना अनुदानाची मर्यादा कमी असलेने काही लाभार्थी वंचीत राहत असल्यास त्याबाबत चा प्रस्ताव पाठविण्यात यावा आम्ही त्यास मान्य देवू असे ते यावेळी म्हणाले, आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना मध्ये अधिक कामगीरिची आवश्यकता असल्याचे सांगितले.दुर्गम भागातील शीबिरी घेणेबाबत व गरोदर महिला/ मातांना वेळेवर बुडित मजुरी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे संबंधित विभागास सुचना दिल्या.

रोजगार निर्मिती करिता गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध गौण वन उपजामुळे रोजगार निर्मिती करतांना सदर रोजगार कायम स्वरुपी राहण्यासाठी विविध योंजनांचा/ विभागाचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सन 2022-23 पासुन ञयस्थ संस्थे याबाबत लाभार्थ्याची माहिती घेतली जाणार असल्याचे सांगितले. रोजगार निर्मिती द्वारे द्रारिद्र निर्मूलन साधण्यासाठी उमेद, माविम,आत्मा यांच्ये बचत गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांचे मार्फत शेळी/बकरी पालन, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसाय याबाबत चे प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत नीरदेश दिले.

या अगोदर आयुक्त यांनी कोरची तालुक्यातील बेलारगोदी, मसेली,नवेझरी,साल्हे, भिमपुर,या गावानां भेट दिली.सदर गावांमध्ये मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आत्मा, कृषी विभाग,माविम,उमेद,या विभागांकडुन करण्यात येत असलेल्या कामांची पाहणी केली.जामध्ये स्वंयमरोजगार किट,कृषी अवजार,बँक,आंबा चिंच प्रक्रिया केंद्र ट्रँक्टर डोजर-रिपर-साहित्य वाटप योजना यांची पाहणी केली व सदर योजना अधिक प्रभावीत पणे राबविण्यासाठी मार्गदर्शन करुन आवश्यक सुचना दिल्या.

कुरखेडा तालुक्यातील रामगड या ठिकाणी भेट देऊन उमेद कार्यालयाकडुन राबविण्यात येणाऱ्या जांभुळ सिताफळ प्रक्रिया केंद्राची पाहणी केली.धानोरा तालुक्यातील पेंढरी, जारावंडी या भागात प्रत्यक्ष भेट देऊन संवेदनशील गावाची माहीती घेतली जेणेकरुन जास्तीत जास्त योजनांचा लाभ सदर गावांना देता येईल.आयुक्तानी गडचिरोली जिल्हातील दौर्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरु असलेल्या फुलोरा प्रकल्पास वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. तसेच गोंडवाना विद्यापिठामध्ये सुरु असलेल्या ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षणास भेट दिली.

Previous articleभामरागड येथे माडिया महोत्सवाची उत्साहात सुरुवात.!
Next articleजिल्हा क्रीडा संकुलच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचा निधी उपलब्ध करून द्यावा आमदार डॉ देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here